बारामतीत रेशनिंग धान्याच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – रेशनिंगवरील गहू, तांदुळ, साखरेची सरकारी पोती बदलून ते धान्य
दुसऱ्या साध्या पोत्यात भरुन त्यांचा काळा बाजार करण्याच्या प्रकार बारामती गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील एका गोदामावर छापा घालून पोलिसांनी रेशनिंगवरील धान्य व टेम्पो असा १२ लाख ७१ हजार ३८० रुपयांचा माल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तिघे फरार झाले आहेत. या कारवाईमध्ये ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा १५ टन गहू, २ लाख ७० हजार रुपये किमतीचा १३ टन ५९९ किलो तांदूळ, ८ हजार ७५० रुपये किमतीची २५० किलो साखर, ४७ हजार ६३० रुपये रोख, ६ लाख रुपये किमतीचा टेम्पो, ११६ पांढऱ्या रंगाची सरकारी प्लॅस्टिक पोती, ५२ खाकी रंगाचे सरकारी पोती जप्त करण्यात आला आहे.

रेशनिंगचा काळा बाजार होत असल्याची माहिती बारामती क्राइम ब्रँच पथकातील पोलीस कर्मचारी संदीप जाधव यांना माहिती मिळाली. त्यावरुन बारामती क्राइम ब्रँचने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामावर छापा टाकला. तेथे रेशनिंगचा गहू व तांदूळ रेशन दुकानदाराकडून घेऊन त्याची सरकारी पोती बदलली जात असत. तसेच, ते धान्य दुसऱ्या नवीन पोत्यात भरून त्याची विक्री करण्याचे नियोजन केले जात असे. त्यासाठी काळ्या बाजारातील धान्य खरेदी करून त्याचा साठा केला जात असे. काळ्या बाजारातील माल रूममध्ये भरलेला, तसेच आयशर टेम्पोमध्ये भरलेला माल मिळून आला आहे.

सौरभ सुधीर शहा, सुधीर जवाहरलाल शहा, अक्षय मुथा, जाफर शेख अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. यापैकी सौरभ यास अटक करण्यात आली आहे. इतर तिघे फरार झाले आहेत.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like