Raveena Tandon | रवीना टंडनची मुलगी सोशल मीडियावर लोकप्रिय: पण होणार नाही अभिनेत्री, निवडले ‘हे’ करिअर क्षेत्र

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले होते. रविनाचा चाहता वर्ग आज देखील तिच्या अदांवर फिदा आहे. पण सध्या रवीना सोबतच तिच्या मुलीची (Raveena Tandon Daughter) देखील चर्चा सुरु झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी हिने तिच्या आईच्या सौंदर्याचा वारसा पुढे घेतला आहे. रवीनाची (Raveena Tandon) मुलगी आता मोठी झाली असून राशा थडानी (Rasha Thadani) ही सध्या चर्चेच्या वर्तुळात आली आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असणारी राशा बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले असले तरी राशाने तिचे करिअर निवडले असून ती हिरोईन होण्याच्या मार्गावर सध्या तरी दिसत नाही.

अनेक बॉलीवुड सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या मुलींनी आता पदार्पण केले आहे. यामध्ये श्रीदेवीच्या (Sridevi) मुली जान्हवी (Janhvi Kapoor) व खुशी कपूर (Khushi Kapoor), अमृता सिंहची (Amrita Singh) मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) या स्टार किड्स सध्या बी टाऊन मधील यंग अक्टर म्हणून चर्चेत आहे. यामध्ये आता रवीना टंडनची मुलगी देखील चित्रपटांमध्ये हिरोईन (Rasha Thadani Bollywood Debut) म्हणून काम करत तिच्या आई प्रमाणे सर्वांना घायाळ करणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मात्र नुकतीच 18 वर्षे पूर्ण झालेली रविनाची मुलगी राशा थडानी ही चित्रपटसृष्टीमध्ये नाही तर दुसऱ्याच क्षेत्रामध्ये काम करणार आहे. राशाला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये (Wildlife Photography) रस आहे.

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने स्वतः सांगितले आहे की तिला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट असून यासाठी तिच्या आईने तिला सपोर्ट केला आहे. निर्माता अनिल थडानी (Anil Thadani) आणि रवीना टंडन यांची मुलगी राशाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. राशा म्हणाली की, मी 8 वर्षांची असेल तेव्हा मम्माने आम्हाला तिच्यासोबत टायगर सफारीवर नेले होते. आम्ही राजस्थानातील रणथंबोरला (Ranthambore) गेलो. त्यावेळी मी माझ्या आईला कॅमेरा हातात घेऊन ती उत्साही असल्याचे पाहिले होते. तिला वाघाचे फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद करायचे होते.

राशा थडानी हिने जयपुर टाइगर फोटोग्राफी फेस्टिवलमध्येही सहभाग नोंदवला होता. या (Jaipur Tiger Photography Festival 2022) मध्ये सहभागी होणारी राशा ही सर्वात यंगेस्ट पार्टिसिपेंट होती. राशाने तिचे जंगलातील काही अनुभव देखील शेअर केले आहे. ती म्हणाली की, “जेव्हा मी पहिल्यांदा मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान (Bandhavgarh National Park, Madhya Pradesh) या ठिकाणी फोटोग्राफीसाठी गेले होती तेव्हा तिला जंगतील कीडा चावला होता. मात्र याचठिकाणी मी माझा पहिला वाइडलाइफ शॉट घेतला.” राशाने सांगितले आहे की तिला जंगलामध्ये राहून प्राण्यांचे फोटो काढायला खूप आवडतात. आणि हे ती पुढे देखील करत राहणार आहे. सोशल मीडियावर देखील राशा चांगलीच सक्रिय असून तिची मोठी फॅनफॉलोविंग आहे.रवीनाची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी हिने आई प्रमाणे अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये झळकावे अशी अनेक चाहत्यांची इच्छा असली तरी राशाने तिचे हटके करिअर निवडले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी