रावेतला ‘बीआरटी’मध्ये अपघात, एक जागीच ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

भरधाव वेगात बीआरटी मार्गातून आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने दुसऱ्या दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.
[amazon_link asins=’B01LZPUP1O,B014PHNEOW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15583f50-b04f-11e8-81fe-1fe45ee6f238′]

रावेत-औंध बीआरटी मार्गावर भोंडवे चौकात हा अपघात झाला. एमएच १४, एफए ३८२२ ही दुचाकी बीआरटी मार्गातून वेगात येत होती. दरम्यान भोंडवे चौकात रस्ता क्रॉस करत असलेल्या एका हिरो होंडा दुचाकीला धडक बसली. वेगात धडक बसल्याने हिरो होंडा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर दोघे पळून जात होते. त्यावेळी ग्रामस्थ तरुण सचिन भोंडवे आणि त्यांच्या मित्रांनी त्या दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मयत आणि त्या दोघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी