Ravi Rana on CM Uddhav Thackeray | रवी राणांचा CM उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून तुम्ही नामर्दासारखं काम केलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ravi Rana on CM Uddhav Thackeray | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण वरून राज्याच्या राजकारणाचं वातावरण तापलं असल्याचं दिसलं.
अटक केल्यानंतर राणा दाम्पत्यांना जामीन मिळाला.
आता रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे प्रत्येक सभेत आपण मर्द असल्याचं सांगतात.
मात्र नवनीत राणा यांच्यासारख्या मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून त्यांनी नामर्दासारखं काम केलं आहे.’ असं रवी राणा म्हणाले.

 

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राणा दाम्पत्यांनी दिल्लीत (Delhi) विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.
”बाळासाहेब हिंदुत्ववादी होते, तुम्ही इंग्रजांच्या विचारांवर चालून त्यांनी तयार केलेल्या कायद्याच्या आधारे एका महिलेला तुरुंगात टाकलं. नवनीत राणा या तब्येत बिघडल्याने लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) गेल्या. तेथे एमआरआय करतानाचा फोटो बाहेर आला म्हणून शिवसेनेच्या लोकांनी रुग्णालयाला नोटीस दिली.
महाराष्ट्रातील जनतेचे इतर महत्त्वाचे प्रश्न असताना सत्ताधारी शिवसेनेचे नेते एका रुग्णालयाच्या मागे लागले आहेत,’
अशी टीका रवी राणा यांनी केली.

 

पुढे रवी राणा म्हणाले, 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये सभा होत असल्याने आम्हीही 14 मे ला सकाळी दिल्लीतील प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन महाआरती करणार आहोत.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोलण्याची सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना करणार आहोत, असं ते म्हणाले.

 

Web Title :- Ravi Rana on CM Uddhav Thackeray | mla ravi rana and amravati mp navneet rana press conference in delhi criticizes shivsena and cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा