
Ravi Shastri | ‘बीसीसीआयमुळे मागील काही वर्षे मी कॉमेंन्ट्री केली नाही’; शास्त्री BCCI वर बरसले
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ravi Shastri | भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यंदाच्या आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहेत. रवी शास्त्री (Ravi Shastri) हिंदीमध्ये आयपीएलच्या सामन्यांची कॉमेंन्ट्री (Commentary) करणार आहेत. मी गेली 11 वर्षे कॉमेंन्ट्री केली आहे मात्र गेली 5 वर्षे मला कॉमेंन्ट्री करता आली नसल्याचं शास्त्रींनी सांगितलं. ‘स्टार स्पोर्ट्स’नं (Star Sports) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये (Press Conference) ते बोलत होते.
बीसीसीआयच्या (BCCI) घटनेतील ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ (Conflict Of Interest) या नियमामुळे गेली 5 वर्षे मी कॉमेंन्ट्री करू शकलो नाही. बीसीसीआयचं हे कलम मुर्खपणाचं असल्याचं म्हणत रवी शास्त्री यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. सुरेश रैनाला (Suresh Raina) यंदाच्या सीझनमध्ये कोणी बोली लावली नाही. त्यामुळे रैनाही शास्त्रींसोबत कॉमेंन्ट्री करताना दिसणार आहे.
सुरेश रैना हा खऱ्या अर्थाने मिस्टर आयपीएल (Mr. IPL) आहे, त्याने पहिल्या सीझनपासून दमदार कामगिरी केली होती. सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये सुरेश रैनाचा समावेश असल्याचं रवी शास्त्रींनी सांगितलं. त्यासोबतच भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबतही (Indian Captain) शास्त्री बोलले.
दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधून भारतीय संघाला भविष्यातील कर्णधार मिळू शकतो.
यामध्ये ऋषभ पंत (Rishabh Pan), श्रेअस अय्यर (Shreyas Iyer), आणि के. एल. राहुल (K. L. Rahul)
यांना आपलं नेतृत्त्व दाखवून देण्याची मोठी संधी असल्याचं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Ravi Shastri | ipl 2022 conflict of interest clause is former team india coach stupid ravi shastri slams bcci
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update