Bank ग्राहकांसाठी सूचना ! सप्टेंबर महिन्यात 12 दिवस बंद राहणार बँका, करून घ्या महत्वाची कामं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात तसं तर प्रत्येक रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बँका बंद असतात. त्याशिवाय राष्ट्रीय आणि स्थानिक सुट्टीला देखील बँका बंद असतात. सप्टेंबर महिन्यात अनेक सण असतात, त्यामुळे बँकांसोबत शासकीय कार्यालायेही बंद असतात. या सप्टेंबर महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. जर तुम्हाला बँकेत काही काम असेल तर त्या दिवशी सुट्टी नाही याची खात्री करून घ्या. आरबीआयने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त सप्टेंबर महिन्यात अनेक सुट्ट्या आल्या आहेत.

RBI ने सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात बँकांना जास्त सुट्ट्या पडत आहेत.

1 सप्टेंबर – सिक्कीम मध्ये ओणम मुळे बँका बंद राहतील.

2 सप्टेंबर – श्री नारायण गुरु जयंती निमित्त गंगटोक, कोची, तिरुवअनंतपुरम मध्ये बँका बंद राहतील.

6 सप्टेंबर – रविवार असल्याने सर्व राज्यात बँका बंद.

12 सप्टेंबर – महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सर्व राज्यात बँका बंद.

13 सप्टेंबर – रविवार असल्याने सर्व राज्यात बँका बंद.

17 सप्टेंबर – महालय अमावस्या असल्याने कोलकाता आणि बेंगलोर मध्ये बँका बंद राहतील.

20 सप्टेंबर – रविवार असल्याने सर्व राज्यात बँका बंद.

21 सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी दिवस त्यामुळे कोची, तिरुवअनंतपुरम मध्ये बँका बंद राहतील.

23 सप्टेंबर – हरियाणा मध्ये हिरोज शहादत दिवसाची बँकांना सुट्टी.

26 सप्टेंबर – महिन्याचा चौथा शनिवार असल्याने सर्व राज्यात बँका बंद.

27 सप्टेंबर – रविवार असल्याने सर्व राज्यात बँका बंद.

28 सप्टेंबर – सरदार भगत सिंह जयंती असल्याने पंजाब मध्ये अनेक बँकांना सुट्टी असेल.

SBI मधून ओटीपी आधारित कॅश काढण्याची नवीन सर्व्हिस

स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम मधून कॅश काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. SBI च्या ग्राहकांना आता रात्री एटीएम मधून कॅश काढताना बँकेमध्ये रजिस्टर असलेल्या नंबरचा मोबाईल सोबत ठेवावा लागणार आहे. बँकेने रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत एटीएम मधून 10 हजार पेक्षा अधिक कॅश काढण्यासाठी OTP बेस्ड सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांनी जर दुसऱ्या बँकांच्या एटीएम मधून कॅश काढली तर हा नियम लागू होणार नाही.

कसं काम करणार नवा सिस्टम

SBI च्या ग्राहकांना एटीएम मधून कॅश काढताना त्यांचा मोबाईल सोबत ठेवावा लागणार आहे. ट्राजंक्शनच्या वेळी बँकेकडून मोबाईलवर वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल. तो ओटीपी नंबर एंटर करावा लागेल.