RBI च्या ‘डेप्युटी गव्हर्नर’ पदासाठी मराठी माणसासह ‘या’ 7 जणांची नावे चर्चेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरचे पद खाली असून विरल आचार्य यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. सध्या कॅबिनेटच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती या पदांसाठी व्यक्तीचा शोध घेत असून एका महिन्याच्या आत हे रिक्त पद भरण्यात येणार आहे. त्याचदरम्यान या समितीने सात नावे नक्की केली असून ७ नोव्हेंबर रोजी या पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, या सात जणांमध्ये एक RBI अधिकारी, 3 IAS अधिकारी आणि 3 अर्थतज्ञांचा समावेश आहे. हे सात जण आहेत या पदाच्या शर्यतीमध्ये

1) क्षत्रपति शिवाजी (1986 च्या महाराष्ट्र कैडरचे IAS,)

2) अरुणिश चावला (संयुक्त सचिव, व्यय विभाग)

3) मनोज गोविल (प्रमुख आर्थिक सचिव, 1991 च्या MP कैडरचे IAS )

4) मायकल पात्रा (आरबीआय एग्जिक्यूटिव डायरेक्टर)

5) चेतन घाटे (प्रोफेसर, भारतीय सांख्यिकी संस्थान)

6) संजीव सांयल (मुख्य आर्थिक सल्लागार

7) प्राची मिश्रा (अर्थशास्त्री, गोल्डमन सॉक्स)

गोविल आणि चावला यांच्याकडे अर्थमंत्रालयात विविध विभागात काम केल्याचा अनुभव आहे. तर छत्रपती शिवाजी हे आधी SIDBI मध्ये कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये देखील काम केले आहे. 1998 ते 2000 पर्यंत ते अर्थमंत्रालयात देखील कार्यरत होते. मायकल पात्रा हे आरबीआयचे अधिकारी असून ते सध्या EDमध्ये कार्यरत आहेत. तर चेतन घाटे हे अर्थतज्ज्ञ आहेत.

Visit : Policenama.com