PM मोदींच्या स्वच्छता सफाईची ‘चर्चा’, पण खऱ्या सफाई कामगारांना महिन्यापासून पगारच नाही

चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडूतील मामल्लापूरम आणि महाबलीपूरम या दोन शहरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात दोन दिवशीय अनौपचारिक परिषद झाली. शुक्रवार आणि शनिवारी ही अनौपचारिक परिषद पार पडली. याच दरम्यान नरेंद्र मोदी यांनी महाबलीपूरम येथील समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारत असताना किनाऱ्याची साफसफाई केली. मोदींच्या साफसफाईची खूप चर्चा झाली. मात्र, या मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीसाठी संपूर्ण शहर स्वच्छ ठेवणाऱ्या खऱ्या सफाई कामगरांना मागिल एक महिन्यापासून पगारच दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.

नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीआधी मामल्लापुरमचे सर्व रस्ते स्वच्छ करण्यासाठी सफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले. या दोघांची भेट शहरात होणार असल्याने शहर स्वच्छ ठेवण्यात आले होते. शहराच्या कोणत्याही सार्वजनीक ठिकाणी कचरा होणार नसल्याची काळजी प्रशासनाने घेतली. मात्र, त्याच कर्मचाऱ्यांना महिन्याभरापासून पगार मिळालेला नाही. एवढेच नाही तर सफाईसाठी नेमण्यात आलेल्या अतिरीक्त कर्मचाऱ्यांना देखील पगार देण्यात आलेला नाही.

मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या जी शिवथरी यांना दिवसाचे शंभर रुपये पगार मिळतो. मात्र तो पगारही त्यांना मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी पंचायतीने कामासाठी लोकं पाहिजे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी आम्ही काही गावकरी काम करण्यासाठी तयार झालो. मात्र, आम्हाला अद्याप केलेल्या कामाचे पैसे मिळाले नसल्याचे शिवथरी यांनी सांगिते. तसेच हा पगार कधी मिळणार हेही त्यांना माहिती नाही.
Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी