5 कॅमेरे असणार्‍या Realme 5i चं नवं व्हेरिएंट लॉन्च, किंमत फक्त 9999, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Realme 5i हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. आता रियलमीने याचे एक नवीन व्हेरिएंट लाँच केले आहे. हे नवीन व्हेरिएंट 128GB स्टोरेजसह आहे. Realme 5i ला जानेवारी मध्ये भारतात फक्त 4GB रॅम + 64GB स्टोरेजसह सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले होते. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये क्वाड कॅमे सेटअप आणि 5,000mAh ची बॅटरी मिळते. Realme च्या या फोनचा मुकाबला Xiaomi च्या Redmi Note 8 सोबत आहे, जो की 4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेजसह येतो.

Realme 5i च्या नवीन 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 64GB व्हेरिएंटपेक्षा 1000 रुपयांनी जास्त आहे. Realme 5i चे 64GB व्हेरिएंटला भारतामध्ये 8,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते. या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंट्सना फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाइटवर खरेदी करता येते. ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन एक्वा ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Realme 5i च्या वैशिष्ट्यांबद्दल बघितले तर, ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 9 पाई बेस्ड ColorOS 6.0.1 वर चालतो आणि त्यात 20:9 रेशोसह 6.52 इंचाचा HD+ (720×1600 पिक्सल) इन-सेल डिस्प्ले दिला गेला आहे.

यामध्ये 4GB LPDDR4X रॅमसह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या सेटअपचा प्राथमिक कॅमेरा 12MP चा आहे. यासह 8MP वाइड एंगल कॅमेरा आणि पोर्ट्रेट आणि मॅक्रोसाठी 2MP चे दोन कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी त्याच्या फ्रंटवर 8MP चा कॅमेरा आहे.

Realme ने त्यामध्ये 64GB/128GB मेमरी दिली आहे. कार्डच्या मदतीने ही मेमरी 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS, मायक्रो-यूएसबी आणि एक 3.5mm हेडफोन जॅकचा सपोर्ट देण्यात आला आहे. Realme 5i ची बॅटरी 5000mAh असून येथे मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.