Red Light | ‘सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा’ ! राजेश्वरी खरातचा नवा अंदाज, ‘रेड लाईट’चं पोस्टर रिलीझ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट फॅन्ड्री (Fandry) प्रदर्शित झाल्यानंतर, सगळ्यात जास्त चर्चा झाली ती जब्या आणि शालूची. म्हणजे सोमनाथ अवघडे (Somnath Awghade) आणि राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) यांची. राजेश्वरीच्या अभिनयाची स्तुती झाली. आता हीच राजेश्वरी एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजेश्वरीच्या ‘रेड लाईट’ (Red Light) या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. राजेश्वरीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘रेड लाईट’चं (Red Light) पोस्टर पोस्ट केलं आहे.

https://www.instagram.com/p/CRdYWXjJw9s/?utm_source=ig_web_copy_link

‘रेड लाईट’ चित्रपटाचं पोस्टर पोस्ट करताना राजेश्वरीनं एक मेसेज देखील दिला आहे. ‘सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा, पण माझे अश्रू तू विकत घेऊ शकतोस का ? बनते एक स्त्री वेश्या, पण खरच स्वईच्छेने का ? प्रश्न हा सोडवून बघ समाजा, कळेल मग व्यथा वेश्येच्या मागच्या स्त्री ची तुला!’ असा एक संदेश राजेश्वरीनं टाकला आहे.

https://fb.watch/6Q1NawAJv9/

या सिनेमाचं दिग्दर्शन अनमोल मुनगंटीवार (Anmol Mungantiwar) यांनी केलं आहे. तर निलेश नगरकर (Nilesh Nagarkar) यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक नागराज मजुळे यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता (National award winner) चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी खूप गाजली. ही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदलेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

Web Titel :- red light marathi film poster fandry fame actress rajeshwari kharat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवसेनेचे माजी खा. आढळराव पाटलांनी काढली खासदार अमोल कोल्हेंची ‘उंची’, म्हणाले – ‘कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा…’ (व्हिडीओ)

DGP Sanjay Pandey | काय सांगता ! होय, चक्क पोलीस महासंचालकांनी Facebook वरुन दिला Work Report

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक