Reduce Belly Fat | सकाळी रिकाम्यापोटी ‘हे’ 5 ड्रिंक प्यायल्याने वितळू शकते पोटाची चरबी, लवकर दिसू लागेल प्रभाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुम्हाला पोटाची चरबी (Reduce Belly Fat) कमी करायची असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. चुकीचा आहार (Diet Mistakes) आणि शारीरिक हालचालींच्या (Physical Movement) अभावामुळे लोक मोठ्या प्रमाणात लठ्ठ (Fat) होत आहेत. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि संपूर्ण शरीर सडपातळ (Reduce Belly Fat) बनवण्यात मदत करणारे अनेक सोपे मार्ग आहेत.

 

देशातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुलतानी (Dr. Abrar Multani) म्हणतात की काही ड्रिंक सकाळी घेतल्याने पोटाची चरबी कमी (Reduce Belly Fat) करण्यास मदत करतात. मेटाबॉलिज्म (Metabolism) वाढवणार्‍या ड्रिंकची यादी खाली दिली आहे जी ड्रिंक (Drink) तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता. ही ड्रिंक वजन कमी करण्यास मदत करतील. सकाळी या ड्रिंकचे सेवन करणे चांगले आहे, कारण याच वेळी तुमचे मेटाबॉलिज्म उच्च स्तरावर असते.

 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी पाच ड्रिंक (Five Drinks To Reduce Belly Fat) –

1. जिर्‍याच्या पाण्याने कमी होते पोटाची चरबी (Jeera Water)
जिरे पाणी (Jeera Water Reduces Belly Fat) हे एक उत्तम लो-कॅलरी ड्रिंक (Low-calorie Drink) आहे, जे पचनाला चालना देते आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की हे ड्रिंक भूक कमी करण्याचे आणि वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आश्चर्यकारक काम करते.

 

हे पेय तयार करण्यासाठी, प्रथम एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे (Cumin) टाका आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी गॅसवर उकळवून कोमट झाल्यावर सेवन करा.

2. बडीशेपच्या पाण्यामुळे कमी होते पोटाची चरबी (Fennel Water Reduces Belly Fat)
बडीशेपमध्ये (Fennel) शरीरासाठी डिटॉक्सिफाईंग गुणधर्म (Detoxifying Properties) असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी डिटॉक्सिफायिंग प्रभावी आहे. एवढेच नाही तर बडीशेप मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करते.

 

त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे पेय तयार करण्यासाठी, एक चमचा बडीशेप पाण्यात मिसळा आणि रात्रभर ठेवून द्या. दुसर्‍या दिवशी सकाळी गॅसवर उकळवा आणि कोमट झाल्यावर रिकाम्या पोटी सेवन करा.

 

3. ओव्याचे पाणी कमी करते पोटाची चरबी (Ajwain Water Reduce Belly Fat)
आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात की ओवा (Ajwain) मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतो.
ओवा पचनशक्ती (Digestion) वाढवतो आणि पोषक तत्वांचे (Nutrients) चांगल्या प्रकारे शोषण करण्यास मदत करतो.

 

हे ड्रिंक बनवण्यासाठी दोन चमचे भाजलेला ओवा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
सकाळी उठल्यावर गॅसवर उकळवा आणि कोमट झाल्यावर त्यात मध मिसळून सेवन करा.

 

4. लिंबूपाणी कमी करते पोटाची चरबी (Lemon Water Reduces Belly Fat)
सकाळी उठून एक ग्लास कोमट लिंबू पाणी (Lemon Water) प्या, ते तुमच्या शरीरासाठी चमत्कार करू शकते.
कारण हे ड्रिंक अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आणि पेक्टिन फायबरने (Pectin Fiber) परिपूर्ण आहे, जे पोटाची चरबी वितळण्यास मदत करते.

 

ड्रिंक तयार करण्यासाठी, एक ग्लास पाणी घ्या, त्यात लिंबाचा रस पिळून घ्या आणि त्यात एक चमचा मध (Honey) घाला.
तुमचे मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी ते प्या.

 

5. पोटाची चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त (Green Tea for Weight Loss)
ग्रीन टी (Green Tea) पोटाची चरबी आणि वजन कमी करण्यात देखील मदत करू शकते.
हे ड्रिंक मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी ओळखले जाणारे अँटिऑक्सिडंट्स (कॅटिचिन) ने युक्त आहे.
जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी ड्रिंकमध्ये साखर (Sugar) घालू नका. मात्र, चव वाढविण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घालू शकता.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Reduce Belly Fat | five drinks to reduce belly fat how to make belly fat disappear belly fat tips wajan kami karnyache upay

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मौजमजेसाठी 43 लाख चोरणाऱ्या रोखपालाला लोणीकंद पोलिसांनी गोव्यातून केली अटक

 

White Hair Problem | पांढरे केस होतील पूर्णपणे काळे, महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी ‘या’ 2 पानांचा करा वापर

 

Gold-Silver Prices | जागतिक बाजारात दर घसरल्याने सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर