‘या’ देशांमधून सर्वाधिक ‘शरणार्थी’ येतात भारतात, ‘UNHCR’ रिपोर्टव्दारे झाला ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशात नागरिकता दुरुस्ती कायदा 2019 (सीएए) अस्तित्त्वात आल्यानंतर देशातील बर्‍याच भागात खळबळ उडाली आहे. त्याअंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या तीन देशांच्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे नियम भारताने तयार केले आहेत. या देशांमधून निर्वासित भारतात येतात, परंतु मिळालेल्या माहितीनुसार इतरही काही देश आहेत जेथून सर्वात जास्त शरणार्थी देशात आले आहेत.

संयुक्त राष्ट्र उच्चायुक्त (UNHCR) यांच्या मते, शरणार्थी असे आहेत ज्यांना युद्ध, हिंसा किंवा छळ अशा कारणांसाठी आपला देश सोडून इतर देशात राहायला भाग पाडले जाते. परंतु निर्वासिताचा दर्जा मिळण्याचीही प्रक्रिया आहे. इतर देशांमध्ये आश्रय घेणार्‍या लोकांना निर्वासिताच्या परिभाषेत नमूद केलेली कारणे सिद्ध करावी लागतात. यासाठी आश्रय मिळविण्यासाठी त्या देशाच्या सरकारकडे अर्ज करावा लागतो. अर्ज स्वीकार झाल्यानंतर निर्वासित दर्जा दिला जाते.

देश : इतर देशांमधील किती शरणार्थी आहेत
सीरिया : 66,32,4551
अफगाणिस्तान : 26,76,619
दक्षिण सुदान : 22,85,257
म्यानमार : 10,96,213
सोमालिया : 9,49,487
भारत : 9601
एकूण – 2,01,17,561

52 हजार भारतीयांच्या आश्रयाबाबत कोणताही निर्णय नाही :
जगभरात भारतातून 9,601 शरणार्थी आहेत, परंतु सुमारे 52 हजार भारतीय आहेत ज्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये आश्रयासाठी अर्ज केले आहेत. ज्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यूएनएचसीआरच्या अहवालात म्हटले की, बहुतेक भारतीय अमेरिकेत आहेत. येथे 6,110 निर्वासित भारतीय आहेत. यानंतर कॅनडामधील 1,457 शरणार्थी भारतीय दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

भारतातून अधिक शरणार्थी पाकिस्तानात आहेत
तुर्की : 36,81,685
पाकिस्तान : 14,04,019
युगांडा : 11,65,653
सुदान : 10,78,287
जर्मनी : 10,63,837
भारत : 1,95,891

भारतातील या देशांचे बहुतेक निर्वासित :
यूएनएचसीआरच्या अहवालानुसार भारतातले बरेच शरणार्थी फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधून नसून इतरही अनेक देश आहेत. येथून येणार्‍या बहुतेक लोकांना भारतात निर्वासिताचा दर्जा मिळाला आहे.
चीन – 1,08,008
श्रीलंका – 60,802
म्यानमार – 18,813

2018 मध्ये या देशांनी भारतीयांना निर्वासित दर्जा दिला
अमेरिका – 1,531
कॅनडा – 280
इटली – 120
यूके – 68
ऑस्ट्रेलिया – 51

दरम्यान, UNHCR च्या अहवालानुसार दिलेल्या या आकडेवारीनुसार, हे आकडे 2018 च्या शेवटपर्यंत आहेत. हे फक्त शरणार्थी आणि आश्रय शोधणार्‍या लोकांबद्दलच आहे. कायदेशीर किंवा बेकायदेशीर स्थलांतरितांबद्दल यात कोणतीही माहिती दिलेली नाही. वास्तविक आकडे अधिक असू शकतात. कारण भारताने निर्वासितांच्या स्थितीशी संबंधित करारावर स्वाक्षरी केलेली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/