पत्रकार दिपक माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रकार दिपक माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. यासाठी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना व कळंब पोलीसांना निवेदन देण्यात आले आहे.

कळंब येथील पत्रकार दिपक माळी यांच्यावर येरमाळा रोडवरील हसेगाव जवळील निसर्गराजा धाब्याजवळ दि.२३ रोजी, सायंकाळी ६ वाजता शफिक मोमीन, महेबुब शेख व इतर दोन जणांनी येवुन शिवीगाळ करत धाब्यामधील खुर्चा व दगडांनी मारहान केली आहे. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या या समाजकंटकावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा यासाठी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना व कळंब पोलीसांना निवेदन देवुन आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर, विश्वस्त सतीश टोणगे, पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे, माधवसिंग राजपुत, शितलकुमार घोंगडे, रमेश अंबीरकर, बालाजी सुरवसे, अमर चोंदे, ओंकार कुलकर्णी, राजे सावंत, शिवप्रसाद बियाणी, नरसिंग खिचडे यांच्यासह शिवसंग्रामचे अविनाश खापे, संभाजी ब्रिगेडचे राहुल चोंदे आदी पत्रकार उपस्थित होते. सर्व आरोपींना तात्काळ अटक करून लवकरात लवकर गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.