Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर राज्यातील तब्बल 11000 कैदी ‘पॅरोल’ व ‘जामीना’वर सुटणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने देशात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी तब्बल 11 हजार आरोपींची पॅरोल आणि जामीनावर तातडीनं सुटका करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारागृह प्रशासनाला आणि इतर संबंधित विभागांना दिलेल्या आहेत.

जेलमधील 11 हजार कैद्यांची पॅरोल आणि जामीनावर सुटका होणार आहे मात्र त्यामध्ये टाडा, पास्को, आर्थिक गुन्हयांमध्ये शिक्षा भोगणार्‍या अथवा अंडर ड्रायल असणार्‍यांना तसेच देशविघातक कृत्य करणार्‍यांची सुटका होणार नाही अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक आणि राज्य कारागृहाचे प्रमुख सुनील रामानंद यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलताना दिली आहे. ही प्रक्रिया सध्या सुरू असून आगामी आठवड्यात काही अटी व शर्तींवर राज्यातील 11 हजार कैद्यांना पॅरोल आणि जामीनावर सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये कच्च्या कैद्यांसह शिक्षा सुनावण्यात आलेल्या देखील काही कैद्यांचा समावेश असणार असल्याचे अप्पर पोलिस महासंचालक आणि राज्य कारागृह प्रशासनाचे प्रमुख सुनील रामानंद यांनी स्पष्ट केले आहे.

You might also like