रिलायन्स एंटरटेनमेंट ग्रुपच्या सीईओंना ‘कोरोना’ची लागण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  देशभरातील कलाविश्वात काम करणार्‍या अनेकांना कोरोनाची बाधा झाली असून हे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. आता रिलायन्स एंटरटेनमेंट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शिबासिश सरकार यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शिबासिश सरकार यांना मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या प्रकृती स्थिर असून माझ्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरु आहेत. बरा होऊन लवकरच पूर्ववत काम करण्यास सुरुवात करेन, अशी प्रतिक्रिया शिबासिश सरकार यांच्याकडून देण्यात आली आहे.

यापूर्वी, अभिनेता किरण कुमार, चित्रपट निर्माते करिम मोरानी आणि त्यांच्या मुली अभिनेत्री झोया मोरानी आणि शाजा मोरानी यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. लोकप्रिय गायिका कनिका कपूरला सर्वप्रथम करोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like