फायद्याची गोष्ट ! Jio चा स्वस्त रिचार्ज प्लान, दररोज 3GB डेटा आणि कॉलिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने त्यांच्या युजर्ससाठी नवीन प्लॅन आणले आहेत. या प्लॅन्समध्ये युजर्सना दिवसाला ३ जीबी डेटा मिळणार आहे. पण इथे आपण सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. या प्लॅनची किंमत ३४९ रुपये आहे.

जिओचा ३४९ रुपयांचा प्लॅन
हा प्रीपेड प्लॅन असून यात ३ जीबी डेटा मिळणार आहे. तर या प्लॅनची वैधता २८ दिवसाची असणार आहे. दिवसाला ३ जीबी डेटाप्रमाणे युजर्सना एकूण ८४ जीबी डेटा मिळेल. सोबतच युजर्सना जिओ ते जिओ नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि नॉन जिओ नेटवर्कवर १००० मिनिट कॉलिंगची सुविधा मिळेल. दिवसाला १०० एसएमएस आणि जिओ ऍप्सवर मोफत सदस्यत्व मिळेल. कंपनी व्होडाफोन आणि एअरटेलच्या तुलनेत जास्त डेटा देत आहे.

व्होडाफोनचा २९९ रु. चा प्लॅन
व्होडाफोन आपला २९९ रुपयांचा प्लॅन आणत असून त्यात दिवसाला २ जीबी डेटा मिळत आहे. तर कंपनीच्या डबल डेटा ऑफरमध्ये युजर्सना दिवसाला ४ जीबी डेटा मिळेल. युजर्सना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग मिळणार असून दिवसाला १०० एसएमएस आणि व्होडाफोन प्ले व झी५ चे सब्स्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.

एअरटेलचा ३४९ रु. चा प्लॅन
एअरटेलच्या ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला २ जीबी डेटाप्रमाणे युजर्सना ५६ जीबी डेटा मिळेल. सोबतच सर्व नेटवर्कवर कॉलिंग सुविधा आणि दिवसाला १०० एसएमएस व ऍमेझॉन प्राईमचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळेल. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे.