Reliance Jio कडून नव्या प्लॅन्सची घोषणा, इथं पहा संपूर्ण यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या रिलायन्स जिओने आपल्या नव्या प्लॅनची घोषणा केली आहे. नव्या दरांमध्ये 40 % नी वाढ करण्यात आलेली आहे. हे सर्व प्लॅन 6 डिसेंबर पासून लागू होणार आहेत. कंपनीने एक नवीन ऑल इन वन प्लॅन लॉंच केला आहे. या प्लॅन नुसार ग्राहकांना आता रोज 1.5 GB डेटा मिळणार आहे. जाणून घेऊयात जिओचे नवीन सर्व प्लॅन नेमके आहेत तरी कसे.

199 रुपयांचा प्लॅन
व्हॅलिडिटी एक महिन्यांची
रोज 1.5 GB डेटा
जिओ टू जिओ फ्री कॉलिंग
इतर नेटवर्कवर 1000 मिनिटांपर्यंत बोलता येणार आहे.

399 रुपयांचा प्लॅन –
प्रत्येक दिवशी 1.5GB डेटा,
2 महीने व्हॅलिडिटी,
जिओ टू जिओ फ्री कॉलिंग
इतर नेटवर्क 2000 मिनिटांचे कॉलिंग
Reliance Jio ने नए प्लान्स का किया ऐलान, यहां देखें पूरी लिस्ट

555 रुपयांचा प्लॅन
3 महीने व्हॅलिडिटी
प्रतिदिन 1.5GB इंटरनेट डेटा
जिओ टू जिओ फ्री कॉलिंग
इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी 3000 मिनिटे.

2199 रुपयांचा प्लॅन
365 दिवसांची व्हॅलिडिटी
प्रतिदिन 1.5GB इंटरनेट डेटा
जिओ टू जिओ फ्री कॉलिंग
इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी 12000 मिनिटे.

Reliance Jio ने नए प्लान्स का किया ऐलान, यहां देखें पूरी लिस्ट

एका महिन्याच्या प्लॅनमध्ये तीन वेगवेगळ्या ऑफर आहेत. जास्तीत जास्ती 3 GB पर्यंत इंटरनेट डेटा मिळू शकतो. या ठिकाणी एक महिन्याचा अर्थ म्हणजे 28 दिवस इतका आहे.

याचप्रकारे तीन महिन्यांच्या प्लॅनमध्ये देखील अनेक ऑफर आहेत. यामध्ये प्रतिदिन 2.5 GB डेटा देखील दिला जाईल. 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 GB डेटा धीला जाणार आहे. 12 महिन्यांसाठीचा एकाच प्लॅन सध्या जिओ ने काढलेला आहे. 6 डिसेंबर पासून हे सर्व प्लॅन लागू होणार आहेत.