Reliance Jio ने पुन्हा जिंकले यूजर्सचे मन, ‘या’ आकर्षक प्लॅनमध्ये मिळवा 1000GB पेक्षा सुद्धा जास्त डेटा आणि वर्षभर करा फ्री कॉलिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने काही दिवसांपूर्वीच विना डेली लिमिट (No Daily Limit) चे अनेक प्लॅन लाँच केले आहेत. आता जिओने यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्यांची किंमत 3,500 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये एकुण 1095जीबी डेटा ऑफर करण्यात येत आहे. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेवूयात… reliance jio launch latest plan rs 3499 check here more plan

Jio चा 3,499 रुपयांचा प्लॅन
यामध्ये व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. ग्राहकांना रोज 3 जीबी डेटा मिळतो. ग्राहक एकुण 1095 जीबी डेटा वापरू शकतात. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 फ्री एसएमएससुद्धा मिळतात. रोजचा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64केबीपीएस राहातो. यामध्ये JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity, JioCloud चे फ्री सबस्क्रीप्शन मिळते.

Jio चा 2599 रुपयांचा प्लॅन
यामध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिदिन 2 जीबी डेटा मिळतो. यात 10जीबी एक्स्ट्रा डेटा सुद्धा दिला जात आहे. म्हणजे या प्लॅन अंतर्गत ग्राहकाला एकुण 740 जीबी डेटा मिळतो. रोजचे डेटा लिमिट संपल्यावर स्पीड 64केबीपीएस होते. यात अनलिमिटेड फ्री कॉलसह रोज 100 एसएमएससुद्धा ग्राहकांना दिले जात आहेत. तसेच डिज्नी+ हॉटस्टार VIP सह जिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रीप्शन मिळते.

Web Titel :- reliance jio launch latest plan rs 3499 check here more plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक