Reliance Jio Plans Hike | रिलायन्स जिओच्या प्लॅन्समध्ये मोठी वाढ, जाणून घ्या कधीपासून होणार लागू

Reliance Jio Plans Hike | एअरटेल आणि व्होडाफोननंतर रिलायन्स जिओच्या ग्राहकांना मोठा झटका ! जिओने तब्बल 480 रुपयापर्यंत केली वाढ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Reliance Jio Plans Hike | मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) एअरटेल (Airtel), व्होडाफोन (Vodafone Idea) प्रमाणे प्रीपेड प्लान्समध्ये (prepaid plans) मोठी वाढ केली आहे. या आधी या दोन्ही कंपन्यांनी प्लॅन्समध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता जिओ ग्राहकांनाही मोठा झटका (Reliance Jio Plans Hike) बसला आहे. जिओने तब्बल 480 रुपयापर्यंत वाढ केली आहे.

रिलायन्स जिओने जारी केलेल्या माहितीनुसार, नवी टेरिफ प्लॅन (New tariff plan) 1 डिसेंबर 2021 पासून लागू होणार आहेत. तरीही आपले प्लॅन्स अन्य मोबाईल कंपन्यांपेक्षा स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामुळे 1 डिसेंबर पासून वाढलेल्या दरात ग्राहकांना रिचार्ज करावे लागणार आहे.

 

 

जिओने आपल्या प्लान्सच्या किंमतीत 16 रुपयांपासून 480 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. जिओ फोनसाठी असलेल्या विशेष प्लॅन 75 ऐवजी 91 रुपये मोजावे लागणार आहेत.
अनलिमिटेड प्लान्स 129 रुपयांचा आता 155 रुपये होणार आहे. डाटा अँड ऑन्स प्लानचे रेट देखील वाढवले आहेत.
6 GB च्या प्लानसाठी 51 ऐवजी 61 रुपये मोजावे लागतील. तर 101 रुपयांच्या 12 GB प्लॅनसाठी 121 रुपये मोजावे लागणार आहेत.
तर 50 GB चा प्लानदेखील 50 रुपयांनी महागला आहे.

 

हा प्लान महागला

जिओच्या प्लॅन्समध्ये सर्वाधिक वाढ ही 365 दिवसांच्या प्लॅनची झाली आहे.
जो प्लॅन 2399 मिळत होता. तो आता 2879 रुपये झाला आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षासाठी 2 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हाईस कॉल व 100 एसएमएस दररोज मिळतात.

 

Web Title :- Reliance Jio Plans Hike | reliance jio plans hikes prepaid tariffs 20 effective december 1 most hike 480 rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | महाविकास आघाडीची दोन वर्षे पूर्ण ! 5 वर्ष पूर्ण करण्यास सरकार खंबीर; छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

Chandrakant Patil | दोन वर्षात फक्त फसवणूक केली, लोकांचे पैसे लुटले; चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडी सरकारला सणसणीत टोला

Uddhav Thackeray | महाराष्ट्रामध्ये पुन्हा Lockdown लागणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला स्पष्ट इशारा