Reliance Jio : ‘हा’ पर्याय निवडल्यास कॉलिंगसाठी 6 पैसे द्यावे लागणार नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षीपासून सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहे. यात एरटेल – आयडिया नवीन आपल्या प्लॅनमध्ये यूजर्संना अनलिमिटेड फ्री कॉलिंग सुविधा पुरवते तर दुसरीकडे रिलायन्स जिओ युजर्संना जिओ टू जिओ फ्री सुविधा असली तरी दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी प्रति मिनिट ६ पैसे मोजावे लागत आहेत. कंपनी इंटरकनेक्ट युसेज चार्ज (IUC) च्या नावाखाली हे पैसे घेत आहे. परंतु, तुम्हला कॉलिंगसाठी हे ज्यादाचे पैसे मोजायचे नसल्यास जिओची नवीन सुविधा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे.

रिलायन्स जिओने नुकतेच भारतात वाय फाय कॉलिंग आणले आहे. जे कोणत्याही वायफाय नेटवर्कवरून काम करू शकते. ही एक फ्री सर्विस आहे. यावरून ग्राहक आरामात व्हाईस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग करू शकतात. सध्या १५० हून अधिक स्मार्टफोन्स वाय फाय कॉलिंगला सपोर्ट करीत आहेत. जर तुमच्याकडे वायफाय नेटवर्कचा अ‍ॅक्सेस नसेल तर तुम्ही कॉलिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम किंवा गुगल ड्युओ यासारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करू शकता. या अ‍ॅप्सचा वापर केल्यास तुमचे पैसे वाचवण्यात मदत होईल. जर तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही FaceTime चा वापर करू शकता.

दरम्यान, IUC चार्ज म्हणजे एक टेलिकॉम ऑपरेटर आहे. जो दुसऱ्या ऑपरेटर युजर्सला कॉल देतो. आययूसी रेट ट्राय (टेलिकॉम रेग्युरेटरी अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया) कडून ठरवला जातो. सध्या यासाठी ६ पैसे द्यावे लागतात.