‘Jio’ ने आणली धमाकेदार ‘ऑफर’, रिचार्जवर मिळणार ‘हे’ ४ डिस्काउंट

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आज सर्वजण घरात बंधिस्त आहेत. अश्या वेळी लोक मोबाईल फोनचा सर्वाधिक वापर करत आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याचे काम करत आहे. त्यात आता रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओने ४ एक्स बेनिफिट ऑफर अंतर्गत रिलायन्स डिजिटल, ट्रेंड्स, ट्रेंड्स फुटवेअर आणि आजियो (Ajio) सोबत भागीदारी केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकाने जून महिन्यात जिओ रिचार्ज केल्यानंतर त्याला इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि फुटवेअरवर डिस्काउंट मिळणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी २४९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करणे अनिवार्य आहे. महत्वाचे म्हणजे हे डिस्काउंट ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.

कसा मिळणार ऑफरचा फायदा
४ एक्स बेनेफिट्स ऑफर अंतर्गत २४९ किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर एक कूपन मिळेल. ज्याचा वापर तुम्ही रिलायन्स डिजिटल, ट्रेंड्स, ट्रेंड्स फुटवियर आणि आजियो स्टोर्सवर करू शकतात. हे कूपन आपल्या माय जिओ अकाउंटवरुन मिळेल. रिचार्ज केल्यानंतर कूपन तुमच्या क्रेडिट अकाउंटवर दिले जाईल. याचा वापर तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने नंतर करु शकता.

जुन्या आणि नवीन दोन्ही कस्टर्ससाठी ऑफर
दरम्यान, जिओची ही ऑफर नवीन ग्राहकांसोबत कस्टमर्ससोबत जुन्या ग्राहकांना सुद्ध मिळणार आहे. जुन्या ग्राहकांना या प्लानचा फायदा उठवण्यासाठी योग्य रिचार्ज करावा लागेल. जर त्यांच्याकडे आधीच कोणता रिचार्ज प्लान आहे. तर अतिरिक्त रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर त्यांना या ऑफरचा लाभ मिळेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like