PMGKY : केंद्र सरकार तिसऱ्या आर्थिक पॅकेजच्या तयारीत, सर्वसामान्यांना मोफत मिळू शकतं धान्य आणि रोख रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशावेळी सरकारकडून (Government) तिसऱ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाऊ शकते. एका मीडिया अहवालानुसार, या पॅकेजमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) येणारे फायदे पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत वाढवले (extend social benefits) जाऊ शकतात. सामान्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकारकडून ही योजना वाढवण्याचा विचार सुरु आहे. जुनपर्यंत असणारी ही योजना सरकारने नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती.

गरीबांसाठी सरकारने कोरोना व्हायरस पँडेमिक दरम्यान होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून वाचवण्यासाठी PMGKY ची घोषणा केली होती. सुरुवातीला ही योजना जूनपर्यंत लागू करण्यात आली होती, मात्र देशातील परिस्थिती पाहता सरकारने या योजनेचे फायदे नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवले आहेत. पण आता पुन्हा एकदा अशी माहिती समोर येत आहे की, सरकार या योजनेचे फायदे मार्च 2021 पर्यंत वाढवू शकते.

पॅकेज 3.0 मध्ये काय असणार ?

एका वृत्तानुसार, या योजनेमध्ये सरकार रोख रकमेबरोबरच धान्य देण्याचा कालावधी वाढवेल. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, या प्रोत्साहन पॅकेज 3.0 मध्ये मागणी वाढवणाऱ्या आणि सामाजिक सुरक्षा देणाऱ्या उपायांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.

रोख रकमेचे ट्रान्सफर होऊ शकते

अहवालानुसार, या तिसऱ्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये 20 कोटी जनधन खाती आणि 3 कोटी ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांसाठी कॅश ट्रान्सफर केली जाण्याची योजना समाविष्ट होऊ शकते. रोख रकमेचे हे हस्तांतरण PMGKY चा महत्त्वाचा हिस्सा असेल.

PMGKY चे फायदे

– या योजनेंअंतर्गत सरकारने एका व्यक्तीला एका महिन्यासाठी 5 किलो तांदूळ आणि गहू मोफत दिले जातात. देशातील जवळपास 81 कोटी जनतेला फायदा होत आहे.
– त्याशिवाय 19.4 कोटी हाऊसहोल्ड्सना दर महिन्याला एक किलो चणा मोफत दिला जातो.
– हे धान्य नॅशनल फूड सिक्योरिटी अ‍ॅक्ट अंतर्गत दिले जात आहे.

PMGKY चा कालावधी का वाढवणार ?

या पँडेमिक दरम्यान सरकारने जनतेला असे आश्वासन दिले आहे की, धान्याच्या कमतरतेमुळे पुढील पाच महिन्यात कोणतेही परिवार उपाशी राहणार नाही. असे म्हटले जात आहे की, याच आश्वासनाच्या आधारावर ही योजना आणखी पुढे वाढवली जाऊ शकते.

बिहार निवडणुकीआधी पॅकेजची शक्यता

अहवालानुसार सरकार लवकरच या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण या पॅकेजचे राजकीय परिणाम देखील दिसतील. बिहार निवडणुकीआधी या पॅकेजची घोषणा केली जाऊ शकते.