‘पोरी, आमचं सगळं गेले गं’, पुरग्रस्तांनी शर्मिला ठाकरे यांच्याकडे केल्या भावना व्यक्त (व्हिडीओ)

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पूरग्रस्त परिस्थितीमध्ये कोल्हापुरातील ब्रह्मनाळमध्ये बोट उलटल्यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज ब्रह्मनाळला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. या वेळी अनेक महिलांनी त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं केल. पोरी, आमचं सगळं गेले गं… असे शब्द ऐकून शर्मिला ठाकरे सुद्धा काहीशा भावुक झाल्या होत्या.

यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, पुरामुळे लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मनसे सर्वोतोपरी मदत करणार आहे. या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. मनसेचे कार्यकर्ते सुरुवातीपासून पूरग्रस्त भागात मदत करत आहेत. पूरग्रस्तांसाठी गरजेच्या वस्तू सगळेच मिळवून देत आहोत. अनेकांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र पुरामुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. त्यांच्या घरातलं सामान, जनावरं, माणसे गेली आहेत. संपूर्ण माणूस सरकारला पुन्हा उभा करावा लागणार आहे. बाकीच्या सगळ्या वस्तू येतील पण सरकारने पूरग्रस्तांची घरं उभारा असं आवाहन शर्मिला ठाकरेंनी यांनी यावेळी केले.

निसर्ग हा सगळ्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यापुढे आपले काहीही चालू शकत नाही. अतिवृष्टी अन् महापूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. सरकारचे प्रयत्न त्यापुढे पुरूच शकत नाहीत. यातून बाहेर पडण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळेच मनसे पूरग्रस्तांबरोबर आहे असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. ब्रह्मनाळमधील शालेय मुलांच्या साधन सामग्रीचा सर्व खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे केला जाईल असेही शर्मिला ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like