Coronavirus : ‘ब्लड कॅन्सर’वरील ’हे’ औषध करू शकतं ‘कोरोना’ रुग्णांना बरं ? जाणून घ्या ‘हे’ 8 मुद्दे

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना व्हायरसचा कहर जगभरात सुरू आहे. भारतात सुद्धा कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, अजूनही कोरोना व्हायरसला आळा घालणारे औषध नसल्याने संशोधक दिवसरात्र काम करून वॅक्सीनचा शोध घेत आहेत. कोरोना रूग्णांवर लक्षणांवर आधारित उपचार केले जात आहेत. अन्य काही आजारावरील औषधे कोरोनावर लागू पडत असल्याचा शोध डॉक्टर आणि संशोधक लावत आहेत.

हायड्रॉक्सीक्लारोक्वीन सुद्धा असेच एक औषध आहे जे कोरोना उपचारासाठी वापरले जात आहे. दरम्यान, नॅशनल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी कॅन्सरसाठी वापरण्यात येणारे औषध वापरून कोरोनाचं शरीरात मोठ्या प्रमाणात होणारे संक्रमण रोखले जाऊ शकते, असा दावा केला आहे. हे संशोधन सायन्स इम्युनॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

संशोधकांनी मांडलेले मुद्दे

1 ब्लड कॅन्सरवरील औषधांचा वापर करून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा श्वासाचा त्रास कमी होऊ शकतो.

2 रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर सुद्धा नियंत्रण मिळवता येते.

3 अ‍ॅकालाब्रुटीनिब असे या औषधाचे नाव असून रुग्णांमधील बीटीके प्रोटीन म्हणजेच म्हणजेच ब्रुटॉन टायरोसीन काईनेज याला ब्लॉक करते.

4 शरीरातील रोगप्रतीकारक शक्तीमध्ये बीटीके प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यामध्ये जेंव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती जास्त अ‍ॅक्टिव्ह होते. तेंव्हा हे प्रोटीन शरीरात रोगाचे संक्रमण रोखण्याऐवजी सूज येण्यास कारणीभूत ठरते. शरीरातील सायटोकायनिनमुळे असे होते.

5 या प्रक्रियेत बीटीके प्रोटीनची सुद्धा भूमिका असते. याचमुळे कॅन्सर औषधाच्या मदतीने शरीरातील या प्रोटीनला रोखले जाऊ शकते.

6 कोरोना रुग्णांच्या शरीरात सायटोकायनिन प्रोटीन जास्त प्रमाणात रिलीज झाल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती उलट्या पद्धतीने काम करते. त्यामुळे फुफ्फुसांना नुकसान होण्यास सुरवात होते.

7 कोरोनाच्या 19 रुग्णांपैकी 11 रुग्णांना दोन दिवस ऑक्सिजन दिला गेला. आठ रुग्णांना दीड दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं. या रुग्णांना कॅन्सरवरील औषध दिले गेले. यामुळे या रुग्णाचा श्वासाचा त्रास कमी झाला आणि फुफ्फुसांवरील सूज देखील कमी झाली. नंतर त्यांना डिसचार्ज दिला.

8 या औषधांचा वापर अतिशय कमी रुग्णांवर झाला असल्याने या औषधांचा क्लिनिकल प्रॅक्टिससाठी वापर करू नये, असेही संशोधकांनी म्हटले आहे.