ऑनलाइन ट्रांजेक्शन आणि ATM मधून पैसे काढणार्‍यांसाठी मोठी बातमी, RBI नं बदलले ‘हे’ नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने (RBI) ऑनलाइन आणि ATM  ट्रांजेक्शन आणि पैशांच्या व्यवहारात मोठा दिलासा दिला आहे. डेबिट कार्डसह खात्यातून इतर ट्रांजेक्शन फेल झाल्यास त्यासंबंधित तक्रार आता काही दिवसात निकाली लागेल. म्हणजेच ऑनलाइन खाते ट्रांजेक्शन करताना खात्यातील पैसे तर कट होतात परंतू मर्चेंटला पैसे जात नाही. अनेकदा एटीएम डेबिट कार्ड स्वाइप करताना असे प्रकार अनेकदा घडतात. यासाठी आरबीआयने यासाठी नवे दिशानिर्देश निश्चित केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल.

1) एखाद्या मर्चेंटला म्हणजेच तुम्ही खरेदी करत असलेल्या दुकानदाराला पैसे न जाता ते कट होतात, तर याला फेल्ड ट्रांजेक्शन म्हटले जाते.

2) शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या टर्न अराऊंड टाइम (TAT) च्या मार्गदर्शक तत्वातून स्पष्ट केले की बँकांना फेल्ड डेबिट कार्ड ट्रांजेक्शनचा प्रकार 5 दिवसात सोडवावा लागेल.

3)  याशिवाय केंद्रीय बँकांना फेल्ड एटीएम, स्वाइप मशील तसेच आधार ऐनेबल्ड पेमेंट्स ट्रांजेक्शनचा प्रकार 5 दिवसात तसेच आयएमपीएस संबंधित फेल्ड ट्रांजेक्शनचा प्रकार एक दिवसांच्या आता निकाली काढावा लागेल.

RBI ने बदलले ट्रांजेक्शन संबंधित नियम
20 सप्टेंबरला आरबीआयने एक सूचना पत्र जारी केले, ज्यात टर्न अराउंड टाइम संबंधित दिशानिर्देश देण्यात आले आहेत.
1) आरबीआयच्या सर्व पेमेंट ऑपरेटर्सला या प्रकाराच्या फेल ट्रांजेक्शनअतंर्गंत निश्चित काळात निकाली काढावे लागतील.

2) आरबीआयने स्पष्ट केले की जर ही प्रकार वेळेत निकाली नाही काढला तर बँकेला दंड भरावा लागेल. हे निर्देश आरबीआयच्या वेबसाइटवर आहे.

आरबीआयने जारी केले नवे नियम
1) खात्यातून पैसे कट झाल्यास आणि एटीएममधून कॅश न काढल्यास 5 दिवसांपेक्षा जास्त उशीर व्हायला नको, यावर 100 रुपये प्रति दिवस दंड भरावा लागेल.

2) खात्यातून पैसे कट झाल्यास पाठवण्यात आलेल्या व्यक्तीच्या खात्यात पैसे आले नाही तर 1 दिवसापेक्षा जास्त उशीर झाल्यास 100 रुपये प्रतिदिवस असा दंड देण्यात येईल.

3) खात्यावरुन पैसे कट झाल्यानंतर मर्चेंटला कंफर्मेशन न मिळाल्यास आणि त्या 5 दिवस उशीर झाल्यास 100 रुपये प्रति दिवस दंड भरावा लागेल. ई कॉमर्स साइट प्रकरणी देखील हे नियम लागू आहेत.

4) कोणत्याही यूपीआय आणि आयएमपीएस संबंधित ट्रांसफर करण्यावर जर पाठवण्यात आलेल्या व्यक्तीला पैसे पोहचले नाही तर यासाठी 1 दिवसानंतर 100 रुपये प्रतिदिवस दंड भरावा लागेल.

5) यूपीआय पेमेंट पूर्ण केल्यानंतर मर्चेंटला कंफर्मेशन न मिळाल्यास 5 दिवसांचा उशीर झाल्यास 100 रुपये दंड असेल. आधार इनेबल्ड पेमेंट सर्विसेज प्रकरणी हे नियम लागू आहेत.

Visit : Policenama.com