इंदापूरात CAA विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या बंदला यशस्वी प्रतिसाद

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – CAA हटवा आणी देश वाचवा, EVM हटवा व देश वाचवा आणी ओबीसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मुख्य मागण्या संदर्भात बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनांच्या वतीने बुधवार दि. २९ जानेवारी 2020 रोजी इंदापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास इंदापूर शहरातील वैद्यकीय सेवा वगळता सर्व किरकोळ दुकानदार व होलसेल व्यापारी वर्ग, छोटे मोठे हाॅटेल व्यावसायीक, टपरीचालक, व्यावसायीक यांनी बंदला पाठींबा देत सर्व दुकाने बंद ठेवल्याने इंदापूर शहरातील बहुजन क्रांती मोर्चाचा बंद यशस्वी ठरला.

CAA, NRC हा कायदा नागरिकांना धर्माच्या आधारावर विभाजीत करण्याचे काम करणारा आहे. हा कायदा एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी आणी धार्मिक अल्पसंख्यांक (जसे मुस्लिम, बौद्ध, शिख, ख्रिश्चन, लिंगायत, जैन) समाजाच्या विरोधात असल्याचे बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनांचे मत असुन त्याला विरोध दर्शविण्यासाठी वरील संघटनांच्या वतीने दि.२९ जानेवारी २०२० रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने इंदापूर शहर बंदचे आवाहन बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनांच्या वतीने नानासाहेब चव्हाण यांनी केले होते. त्यास इंदापूर शहरातील सर्व स्तरातील व्यापारी वर्गाने संपूर्ण शहरातील दुकाने बंद ठेवुन बंदला पांठीबा दर्शवील्याने बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनांनी पुकारलेला इंदापूर बंद यशस्वी ठरला.

बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनांच्या वतीने (citizen amendment act), नागरिकता संशोधन अधिनियम, nrc (राष्ट्रिय नागरिक रजीस्टर) npr ह्या असंविधानिक लोकतंत्र कायद्या विरोधात आणी evm च्या माध्यमातुन होणार्‍या निवडणूक प्रक्रिये विरोधात भारत मुक्ती मोर्चा, मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट, राष्ट्रिय भटके विमुक्त मोर्चा, अ रजा सोशल क्लब, वडार पँथर, एच के जी एन ग्रुप, रामोशी युथ फोर्स, अल-तक्वा बाॅइज, अखील भारतीय माळी महा संघ, इम्रानभाई फ्रेंड सर्कल, सावता परिषद, टिपू सुलतान यंग सर्कल, होळकर युवा सेना, छत्रपती क्रांती सेना, अंजुमन रजा-ए- मुस्तफा, एच के ग्रुप, भटक्या विमुक्त जमाती संघटना, चांद तारा ग्रुप, रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटना, स्वाभिमानी लहुजी शक्ती सेना, लकी ग्रुप, सत्यशोधक जनजागृती संघ, भटक्या विमुक्त जाती जमाती संघटना, भारतीय विद्यार्थी मोर्चा व इतर संघटनांच्या वतीने इंदापूर बंद पुकारण्यात आला होता.

बंद काळात इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने बंद काळात कोणताही अणूचित प्रकार घडला नसल्याची माहीती इंदापूर पोलीस निरिक्षक मधूकर पवार यांनी दीली.

फेसबुक पेज लाईक करा