KYC अपडेशनमध्ये EPFO नं दाखवला ‘वेग’, जाणून घ्या नोकरदारांना कसा होईल फायदा
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संकटाच्या काळात निवृत्ती निधी संस्था ईपीएफओ खूप सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. नवीन नियमांनुसार ईपीएफओने वेगाने क्लेम सेटलमेंट केले आहेत. त्याच वेळी, केवायसी अपडेशनमध्ये देखील बराच वेग दिसून आला आहे.
काय म्हणतात आकडे
ताज्या आकडेवारीनुसार, जुलै 2020 मध्ये ईपीएफओने 2.39 लाख आधार क्रमांक, 4.28 लाख मोबाइल नंबर आणि 5.26 लाख बँक खाती युएएनच्या ग्राहकांच्या खात्यात अपडेट केली आहेत. ही माहिती देताना कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की, ‘सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरही ईपीएफओने एक प्रमुख सामाजिक सुरक्षा संस्था म्हणून डिजिटल मोडद्वारे व्यत्यय न आणता आपल्या ग्राहकांना सेवा दिली आहे. संस्थेने डिजिटल स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचावे अशी त्यांची इच्छा आहे. हेच कारण आहे की केवायसी डेटा अपडेटच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत आणि त्या जलदगतीने पूर्ण केल्या जात आहेत.’
केवायसी अपडेशन करणे ही एक-वेळ प्रक्रिया आहे जी केवायसी तपशीलांसह युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) लिंक करून आपल्या ग्राहकांची ओळख सत्यापित करण्यात मदत करते. ही प्रक्रिया पूर्ण होताच ईपीएफओ ग्राहक डिजिटल पद्धतीने ईपीएफओच्या सेवा घेऊ शकतील. गेल्या काही महिन्यांत ईपीएफओने मोठ्या संख्येने आपल्या कर्मचाऱ्यांना केवायसी अपडेट करण्याचे काम दिले आहे. यामध्ये कर्मचारी वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून केवायसी तपशीलमध्ये सुधारणा करीत आहेत. मोठ्या संख्येने ईपीएफओ कर्मचारी सदस्यांना केवायसी अपडेशनचे काम सोपविण्यात आले आहे.