नगर : महसूल कर्मचाऱ्यांचा संप, तहसील कार्यालयासमोर ठिय्या

नेवासा (जि. नगर) :  पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्वतः मंजूर होऊन ही अद्याप शासन निर्णय काढले जात नसल्याने राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारला होता. या संपात सहभागी होऊन नेवासा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवावा, लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहायक करावे, नायब तहसिलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे, अव्वल कारकून वेतन श्रेणीमधील त्रुटी दूर करणे, शिपाई संवर्गातील तलाठी संवर्गात पदोनत्ती देणे, आकृतीबंधात सुधारणा करण्याबाबत सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करणे, इतर विभागाच्या कामांसाठी नवीन आकृती बंध करावा, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नायब तहसिलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी पदासाठी गृह विभागाच्या धर्तीवर महसूल कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात या आठ मागण्या शासनाकडून तत्त्वतः मान्य करण्यात आल्या आहेत. परंतु शासन निर्णय निर्गमित न झाल्याने राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात नेवासा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन तहसील कार्यालय आवारात ठिय्या मांडला.

यावेळी नायब तहसिलदार संजय परदेशी, नायब तहसिलदार नारायण कोरडे, अतुल भांगे, सतीश क्षेत्रे, राजेंद्र वाघमारे, मिलिंद नवगिरे, विजय नैमाणे, उत्तम रासकर, आनंद दुशिंगे, पांडुरंग नन्नवरे, ओम खूपसे, अशोक कायगुडे, रंजना वाघमारे, सुशीला खोमणे, रतन पवार, ज्ञानेश्वर रक्ताटे, संतोष लहारे, संतोष बारशे, रमेश माळी, रावसाहेब आरगडे, बंडू सोनवणे संपात सहभागी झाले होते. या संपामुळे तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प होते.

यापुढेही संप सुरू राहील
राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात नेवासा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला असून येथून पुढे देखील अशाच प्रकारे संप सुरू राहील।

रोग्यविषयक वृत्त