ड्रग्स केस : जेलमध्येच राहणार रिया आणि तिचा भाऊ शौविक, कोर्टानं सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती सध्या तुरुंगात आहे. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रियाला कोर्टाने 14 दिवस तुरुंगात पाठवले आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अटक करण्यात आलेल्या इतर ड्रग्ज पेडलर्सयांच्या जामीनावर आज निर्णय घेण्यात आला. न्यायालयाने रियाच्या सर्व जामीन याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे रिया आणि तिचा भाऊ शोविक यांची रवानगी तुरुंगात होणार आहे.

बुधवारी कोर्टाने रिया-शोविक यांच्यासह 6 जणांच्या जामिनावर निकाल राखून ठेवला होता. एनसीबीने कोर्टात म्हटले होते की, त्यांना या प्रकरणाची अधिक चौकशी करावी लागणार आहे. अद्याप हे प्रकरण संपलेले नाही. या प्रकरणात रिया आणि शोविक यांना न्यायालयीन कोठीत राहणे आवश्यक आहे. आज सर्वांचे जामीन अर्जावर मुंबईच्या सत्र न्यायलयात सुनावणी झाली. यावेळी रीयाच्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

रियाचे दोन दिवस तुरुंगात गेले आहेत. ज्या दिवशी कोर्टाने निकाल दिला, त्या दिवशी रियाने तिची रात्र एनसीबी लॉकअपमध्ये घालवली. यानंतर, दुसऱ्याच दिवशी रियाला भायखला तुरुंगात हविण्यात आले. रियाच्या सेलजवळ शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्रीणी मुखर्चीचा सेल आहे.

एनसीबच्या चौकशीत रिया आणि तिच्या भावाचे अनेक ड्रग पेडलर्शशी संबंध असल्याचे समोर आले होते. रिया आणि शौविक यांच्यावर ड्रग्ज खरेदी-विक्रीचा आरोप आहे. रियाने ड्रग्ज खरेदी केल्यानंतर एनसीबीकडे कबुली दिली. रियाने स्पष्टपणे सांगितले की, ती सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत होती. त्याचे वेळी रियाचा भाऊ शोविकने सांगितले की, रियाच्या सांगण्यावरुन तो सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असे.