जगातील सर्वात वजनदार क्रिकेटर असा झाला ‘रनआऊट’, पाहून हसू आवरणार नाही (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  वेस्ट इंडिजचा फलंदाज रहकीम कॉर्नवाल याने नुकताच भारताविरुद्ध पदार्पण केले होते. या मालिकेत त्याने त्याच्या गोलंदाजीने सगळ्यांनाच प्रभावित केले होते. सध्या तो कॅरेबिअन प्रीमिअर लीगमध्ये सेंट लुसिया जुक्‍स (St Lucia Zouks) या संघाकडून खेळत आहे. या संघात कॉर्नवाल सलामीला फलंदाजी करत आहे. मात्र गयाना अमेझॉन वॉरियर्स या संघाविरुद्ध खेळताना झालेला रनआऊट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या मजबूत शरीरामुळे त्याला धावण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. मात्र त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांना हसू आवरणे कठीण झाले आहे. प्रेक्षकांबरोबरच या सामन्यात समालोचकांना देखील त्याच्या या कृतीमुळे हसू आवरले नाही.

क्रीजवर पोहोचला मात्र बॅट घासू शकला नाही
फलंदाजीला उतरला असताना त्याने 12 चेंडूंमध्ये 6 धावा केल्या. मात्र यावेळी एक चोरटी धाव घेण्याच्या नादात तो क्रीजपर्यंत पोहोचला, मात्र त्याला बॅट घासत न आल्याने तो धावबाद झाला. त्याचे हे धावबाद बघून समालोचक डॅनी मॉरिसन यांना देखील हसू आवरले नाही. त्यांनी यावर बोलताना म्हटले कि,’रहकीम तुला बॅट जमिनीवर घासायची होती. आता तू हॉटेलवर जाऊन तोंड लपवून बस.

संघाचा देखील पराभव
या सामन्यात सेंट लुसियाने प्रथम फलंदाजी करत कॉलिन डी ग्रँडहोमच्या अर्धशतकाच्या जोरावर 161 धावा केल्या. मात्र गयाना अमेझॉन वॉरियर्सच्या ब्रेंडन किंग याच्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी सहज हा सामना जिंकला.

लाल मिरची खाल्ल्याने वाढते आयुष्यमान ! संशोधकांचा दावा
तुम्हाला माहिती आहेत का कांद्याचे ‘हे’ ६ आश्चर्यचकित फायदे, जाणून घ्या
ग्रीन कॉफी’ मुळे बरा होऊ शकतो मधुमेह, ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे
पुरूषांना ‘या’ समस्या ठरू शकतात त्रासदायक, करा ‘हे’ रामबाण उपाय
तुम्हाला घोरण्याची सवय आहे का? मग घरच्याघरीच करा ‘हा’ खास उपाय
मेंदूची क्षमता वाढण्यासाठी ‘हे’ आहे रामबाण औषध, स्वयंपाक घरातच उपलब्ध