रिक्षा चालकास १ लाख ४० हजार रुपयांचा गंडा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जगदिश सुकलाल माळी वय ४३  व्यवसाय रिक्षा चालक रा.प्लॉट नं.१५ माणिक नगर मार्केट यार्ड परिसर धुळे यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन मी बँकतून बोलतो असे सांगत बनाव करत त्यांचे जवळील बँकीतील खाते नंबर व एटीएम पीन नंबर विचारून घेत बँकेतील जमवलेली लाखोंची रक्कम अज्ञात व्यक्तीने ATM कार्डचा वापर करत चालाखीने त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख ४०  हजार रुपये काढून घेत त्यांना गंडविले.

काही कामकाज निमित्त बँकेत पासबूक भरून घेण्यासाठी ते गेले असता तुमच्या खात्यात रक्कम नाही.असे सांगताच ते एकदम भांबवले.नंतर पोलीस स्टेशन गाठत आपल्या बँकेतील खात्यातील लाखोची रक्कम अज्ञात चोरट्यांने काढून घेतली अशी लेखी तक्रार दिली.या आधारेआझाद नगर पोलीसांनी गुन्हा नोंद केला.असून पुढील तपास पो.कॉ.एम सी पाटील करत आहे.