VIDEO : ‘कागर’ सिनेमाचा #Trailer प्रदर्शित.. पहा रिंकु राजगुरूचे दमदार डायलॉग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या पहिल्याच सैराट या चित्रपटातून दमदार अभिनयाने घराघरात पोचलेली आर्ची म्हणजेच प्रेक्षकांच्या मानत घर करून गेलेली रिंकु राजगुरू तब्बल तीन वर्षांनी नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कागर या तिच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर सिनेमातील गाणं लागलिया गोडी तुझी हे रिलीज झालं होतं. यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

प्रेमकथेवर आधारीत आणि राजकीय पार्श्वभूमी असणारा कागर या चित्रपटात रिंकु राणीची भूमिका साकारत आहे. नवं आणि स्वावलंबी असं स्त्री पात्र कागरमधून पाहायला मिळणार आहे. कधी कधी शर्यत जेथून सुरु होते तिथेच येऊन संपते असा एक रिंकुचा डायलॉग चांगलाच भाव खावून जातो. तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार असे काही विशेष डायलॉग सिनेमाच्या ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतात. अनपेक्षितपणे राणीचा राजकारणात प्रवेश होतो. रिंकुच्या दमदार अभिनयाची झलकही यात दिसून येते आहे. रिंकु सोबत शुभंकर तावडे हा नवोदित अभिनेताही पदार्पण करणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने कागर या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. कागर 26 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कागरच्या टीझरला आणि लागलिया गोडी तुझी या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाचा ट्रेलरदेखील दमदार असल्याचं दिसत आहे.

You might also like