शिल्पा शेट्टी झाली रितेश पांडेच्या ‘हैलो कौन’ या सुपरहिट गाण्याची फॅन, बनवला ‘TikTok’ व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रितेश पांडेचं हैलो कौन हे भोजपुरी गाणं सुपरहिट झालं आहे. युट्युबवरही या गाण्यानं अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. अनेकांनी या गाण्यावर टिकटॉक व्हिडीओ बनवले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील या गाण्याची फॅन झाल्याचं दिसत आहे. तिनंही या गाण्यावर टिकटॉक व्हिडीओ केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

शिल्पाचा हा टिकटॉक व्हिडीओ रिेतेश पांडेनं स्वत: इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रितेश म्हणतो, “आज सकाळी उठलो तेव्हा हा व्हिडीओ दिसला. याच्यामुळे माझा दिवस बनला आहे. खरंच माझ्याकडे शब्द नाहीयेत. शिल्पा मॅमनं हा व्हिडीओ करणं म्हणजे माझ्यासाठी खूप काही आहे. मनापासून धन्यावाद.”

हैलो कौन हे गाणं युट्युबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. केवळ दोन महिन्यात या व्हिडीओनं 333 मिलियन्स(332,854,746) व्ह्युज घेतले आहेत. दीड मिलियन्सहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

या गाण्याचे लिरीक्स आशिष वर्मानं लिहिले आहेत. त्यानंच गाण्याच म्युझिक डायरेक्ट केलं आहे. यात अरेंजर कैलाश पांडे आहे. हे गाणं सोनू वर्मा आणि आशिष यादव यांनी डायरेक्ट केलं आहे.

You might also like