‘रोडीज’ फेम रघु रामची पत्नी ‘नताली’ नं ब्लॅक बिकीनीत दाखवलं ‘बेबी बंप’ ! (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही इंडस्ट्रीत खूप नाव कमावणाऱ्या रोडीज फेम रघु राम लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी नताली दि लुसिओ (Natalie Di Luccio) प्रेग्नंट आहे. सध्या हे कपल आपली ही सुंदर फेज खूपच एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या हे कपल आपल्या बेबीमूनवर आहे. रघुने आपल्या पत्नी सोबत बेबीमूनचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत रघुची पत्नी नताली ब्लॅक बिकीनीत बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.

रघुची पत्नी नताली 7 महिन्यांची प्रेग्नंट आहे. सध्या दोघंही आपला बेबीमूनचा काळ खूपच एन्जॉय करताना दिसत आहेत. दोघांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. नताली दि लुसिओ ही रघुची दुसरी पत्नी आहे. नतालीचा ब्लॅक बिकीनीतील बोल्ड अंदाज चाहत्यांनाही आवडला आहे.

रघुने आपली पहिली पत्नी सुगंधा गर्गसोबत घटस्फोट घेतला आहे. या वर्षीच्या फ्रेंडशिपडेच्या निमित्ताने रघुने पत्नीच्या प्रेग्नंसीची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. रघु आणि नताली 2016 साली भेटले होते.

 

Visit : policenama.com