हडपसर पोलिसांमुळे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पथारीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या रस्त्यांनी हडपसर पोलिसांमुळे मोकळा श्वास घेतला. पथारीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन आणि वाहन चालकांना मार्ग शोधत वाहन चालवावे लागते. याप्रकरणी नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतर हडपसर पोलिसांनी आज (शुक्रवार) कारवाई करुन अतिक्रम हटवले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e357d46e-c33f-11e8-8581-cde6003fe5ed’]

गाडीतळ, मंत्रीमार्केट, गांधी चौक, कामधेनु इस्टेट, माळवाडी रोड, पुणे-सोलापूर रोड परिसरातील मुख्य रस्त्यांवर आज ही कारवाई करण्यात आली.  फुटपाथ-रस्त्यांवर दुकान थाटलेल्या ५४ जणांवर गुन्हे दाखल करुन कारवाई केली. पथारीवाल्यांनी फुटपाथ – रस्त्यांवर आपली दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांना फुटपाथवरुन चालता येत नव्हेत. पादचारी रस्त्यांचा वापर करत असल्याने या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत होती. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. अखेर आज पोलिसांनी पथारिवाल्यांवर कारवाई करुन अनधिकृत अतिक्रण हटवून रस्ता मोकळा केला.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, हडपसर विभागाचे सहायक आयुक्त सुनील देशमुख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील तांबे, गुन्हे विभागाचे निरीक्षक शिवाजी शिंदे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. कारवाईच्या वेळी स्वत: पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea6f2b35-c33f-11e8-a093-5b615d0793d7′]

हडपसर परिसरात बेकायदेशिर रित्या रोडवर व्यवसाय करणाऱ्या पथारीवाल्यांवर दररोज अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायवाड यांनी सांगितले.

चतु:श्रृंगीत १३ लाखांची घरफोडी

बंद रो हाऊसचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील १३ लाखांचा ऐवज चोरुन नेला. हा प्रकार आज (शुक्रवार) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आला. बाणेर रोडवर असलेल्या गुलमोहर रो हाऊसमध्ये ही घटना घडली. निरज पाटील (वय-५१) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजाचे सेफ्टी डोअरची कडी तोडून मुख्य दरवाजा बिजागरीतून बाजूला काढून घरात प्रवेश केला. बेडरुममधील तिजोरीसह तिजोरीमधील ११ लाख ५० हाजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने असा एकूण १२ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक केंजळे तपास करीत आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी