दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार

पेण : पोलीसनामा ऑनलाईन – चोरीच्या गुन्ह्यातील कार दिसताच पोलिसांनी कारचा पाठलाग केला. यामध्ये कारचा अपघात झाला. त्यावेळी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलीस जात असताना दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. हा प्रकार गुरुवारी पहाटेच्या सुमारास आंबेगाव पेट्रोलपंपाजवळ घडला. यावेळी पोलिसांनी दोन दरोडेखोरांना पकडण्यात यश आले असून त्यांचे इतर तीन साथीदार फरार झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी पेणमधून एक इको कार चोरीला गेली होती. या कारचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलीस तपास करताना ही कार पेण नगरपरिषदेच्या नाक्यावरून जाताना दिसली. यावेळी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कारचा पाठलाग केला. मात्र, पोलिसांपासून वाचण्यासाठी दरोडेखोरांनी कार जोरदार पळवली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या एका कंटेनरला धडकली.

पोलीस दरोडेखोरांना अटक करण्यासाठी जात असताना त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याच बरोबर धारदार शस्त्रांचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी धाडस दाखवत दोघांना अटक केली. चोरट्यांनी चोरलेल्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दरोड्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र सापडली. हे दरोडेखोर मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त