येवल्यात पैठणी चोरट्यांचा सीसीटीव्हीसमोर ‘डान्स’

येवला : पोलीसनामा ऑनलाइन – पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला येथील एका दुकानातून चोरट्यांनी तब्बल ३० लाख रुपयांच्या पैठणी चोरल्या. त्यानंतर त्यांनी दुकानात चक्क डान्स केला. त्यांचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

येवला येथील नाकोडा पैठणी या दुकानात हा प्रकार घडला. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. एकूण ३ ते ४ चोरटे होते. त्यांनी दुकानातील सर्व महागड्या पैठणी गोळा केल्या. हातमागावर तयार होत असलेल्या पैठणीही त्यांना काढून घेतल्या. सुमारे ३० लाख रुपयांच्या या पैठणी घेतल्यानंतर त्यांनी दुकानातच डान्स केला. ते करत असलेली चोरी व डान्स दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यावरुन पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Loading...
You might also like