इराणचा अमेरिकी दुतावासाजवळ पुन्हा रॉकेट ‘हल्ला’, इराककडून ‘दुजोरा’

बगदाद : वृत्त संस्था – इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ इराकने पुन्हा एकदा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. दुतावासापासून १०० मीटर अंतरावर दोन रॉकेट डागण्यात आले आहेत. मात्र, या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टॅम्प यांनी देशवासियांना संबोधित केल्यानंतर काही वेळानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.

इराणने मंगळवारी आणि बुधवारी पहाटे सलग दोन दिवस इराकमधील अमेरिकेच्या हवाईतळावर जवळपास २२ क्षेपणास्त्र डागली असून त्यात ८० जण ठार झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आज पहाटे पुन्हा इराकमधील ग्रीन झोन मध्ये रॉकेट हल्ला करण्यात आला. अमेरिकेचे दुतावास असणाऱ्या भागापासून जवळपास १०० मीटर अंतरावर ही रॉकेट पडली. इराक सेनेने या रॉकेट हल्ल्याला पुष्टी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी काल देशवासींयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी इराणवर आणखी कडक निर्बंध घालण्याचा निर्धार व्यक्त केला.

इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नसल्याचे सांगून टॅम्प यांनी इराण विरुद्ध सैनिकी कारवाई करण्याची जरुरी नाही. आर्थिक निर्बंधच पुरेसे ठरणार असल्याचे सांगितले. अमेरिकन वेळेनुसार त्यांनी बुधवारी सकाळी देशवासियांना संबोधित केल्यानंतर काही वेळानेच इराणने ही दोन रॉकेट डागली आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावाने आखातीतील विमान सेवेवर परिणाम झाला असून इराण, इराकच्या हवाई हद्दीतून प्रवेश करण्यास सर्व विमानांना बंदी करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/