Rocky Aur Rani Ki Prem Kahani | U/A प्रमाणपत्र देण्यापूर्वी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटामध्ये करावे लागले ‘हे’ बदल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) व अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा बहुचर्चित चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर व आलिया (Ranveer And Alia) देखील चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘ या चित्रपटाला मात्र सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच CBFC ने U/A प्रमाणपत्र देण्यापूर्वी काही बदल (Changes In RARKPK) करण्यास सांगितले आहे. चित्रपटातील काही डायलॉग मध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपटाला CBFC ने U/A प्रमाणपत्र दिले आहे.


https://www.instagram.com/p/CuPDvdRBcGu/?igshid=MzRlODBiNWFlZA==

प्रेक्षक ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता यामध्ये CBFC बोर्डने प्रमाणपत्र देण्यापूर्वी काही बदल केले आहेत. चित्रपटामध्ये काही अपशब्द वापरण्यात आले होते. मात्र बोर्डने हे शब्द बदलायला सांगितले तर काही अपशब्द काढून टाकायला लावले. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामध्ये एका सीनमध्ये ‘ब्रा’ हा शब्द वापरण्यात आलेला आहे. बोर्डने यावर आक्षेप ( Board objection On RARKPK) घेतला असल्यामुळे तो बदलून त्या जागी ‘आयटम’ हा शब्द वापरण्यात आला आहे. चित्रपटामध्ये एका राजकारणी व्यक्तीचे नाव देखील वापरण्यात आले होते. मात्र पुढील वाद टाळण्यासाठी बोर्डाने तो संपूर्ण सीन कट करायला लावला आहे.


https://www.instagram.com/p/Csp_eljoalS/?igshid=MzRlODBiNWFlZA==


https://www.instagram.com/p/Csp1MbQLm0V/?igshid=MzRlODBiNWFlZA==

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटामध्ये एका सीन दरम्यान लोकसभेचा संदर्भ आणि एक संवाद दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये राजकारणी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा उल्लेख करण्यात आला होता. हा सीन बोर्डाने चित्रपटामधून पूर्णपणे काढायला सांगितला आहे. तसेच चित्रपटामध्ये एका डायलॉगमधील रम ब्रँड ‘ओल्ड माँक’ चा उल्लेख करण्यात आला होता त्यामध्ये आता बदल करत ‘बोल्ड मोंक’ असे बोलण्यात आले आहे.


https://www.instagram.com/p/Cu3wYgvy7Hp/?igshid=MzRlODBiNWFlZA==


https://www.instagram.com/p/CuV6Y2cqDnS/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | …अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाहीत, शिवसेना आमदाराचा इशारा

Swarad Foundation Pune | स्वारद फाऊंडेशन ट्रस्ट आणि हिंदू जनजागृति समितीच्या वतीने युवती व महिलांना मोफत शौर्य प्रशिक्षण

Pune Crime News | नेमक काय घडलं की ACP भारत गायकवाड यांनी पत्नी अन् पुतण्याला घातल्या गोळया; स्वतः केली आत्महत्या

Maharashtra Monsoon Session | ‘विरोधी पक्षनेत्यांनी आम्हाला जे शहाणपण शिकवले ते…’ निधीवाटपावरुन सभागृहात खडाजंगी, देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘मला दुर्दैवाने इतिहासात…’ (व्हिडिओ)

RSS Madandas Devi Passed Away | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदनदास देवी यांच्यावर पुण्यात अंत्यस्कार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार