Rocky Aur Rani Ki Prem Kahani | आलियाच्या दोन्ही चित्रपटाची कहानी एकच; ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ व ‘2 स्टेट’ चित्रपटात आहेत अनेक साम्य

पोलीसनामा ऑनलाइन – अनेक दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट (Actress Alia Bhatt) व अभिनेता रणवीर सिंग (Actor Ranveer Singh) यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपट चर्चेमध्ये आहे. दिग्दर्शक करण जोहर (Director Karan Johar) या चित्रपटाच्या निमित्ताने सात वर्षांनंतर पुन्हा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळाला आहे. रणवीर व आलियाच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली असून आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer Out) ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद असला तरी अभिनेत्री आलियाला या आधी सुद्धा अशा प्रकारची भूमिका साकारताना पाहिले आहे असे मत नोंदविले जात आहे. (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) अभिनेत्री आलियाचा 2014 साली आलेला ‘2 स्टेट’ व आता आलेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या दोन्ही चित्रपटात अनेक गोष्टींमध्ये साम्य (Similarities In 2 State And RARKPK) असल्याचे आता समोर येत आहे.

अभिनेत्री आलिया व रणवीरचा या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटामध्ये लव स्टोरी दाखवण्यात आली असून लग्नासाठी दोन्ही फॅमिलीला पटवण्यासाठी हे एकमेंकांच्या घरी 3 महिने राहयला जातात अशी कहानी दाखवण्यात आली आहे. तर आधी आलेल्या आलिया व अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) ‘2 स्टेट’मध्ये (2 State) तो देखील तिच्या घरी अशाच प्रकारे रहायला गेलेला दाखवला होता. या दोन्ही चित्रपटांमध्ये कपलच्या दोन्ही फॅमिलीचे विचार, संस्कृती, पद्धत पूर्णपणे वेगळी आहे असे दाखवण्यात आले असून दोन्ही चित्रपटांमध्ये लग्नावर फॅमिलीच्या स्टेटस व क्लचरचा परिणाम दाखवला आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ व ‘2 स्टेट’ या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री आलिया भट्टचा देसी लूक दाखवण्यात आला आहे. ‘2 स्टेट’ मध्ये आलिया वेगवेगळ्या कुर्ती स्टाईल करताना दाखवण्यात आली होती. तर या चित्रपटात आलिया फक्त ट्रेलरमध्येच डझनभर साड्यांमध्ये दिसली आहे. तसेच दोन्ही चित्रपटात आलियाची फॅमिली ही भारतीय संस्कृती पुढे चालवणारी, थोडे जुन्या विचारांची थोडक्यात बॉलीवुडच्या स्टीरीयोटाईप क्लासची दाखवण्यात आली आहे. (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Movie Story) फरक फक्त हाच की ‘2 स्टेट’मध्ये आलियाची फॅमिली तमिळ होती तर या चित्रपटात तिची फॅमिली बंगाली आहे.

2014 साली आलेल्या ‘2 स्टेट’ व आता येणाऱ्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या दोन्ही चित्रपटात दोन्ही फॅमिलीचे कल्चर आणि त्यांची संस्कृती व विविधता दाखवणारे कल्चरल गाणे दाखवण्यात आले आहे. 2 स्टेट ‘इसकी उसकी’ हे गाणे (Iski Uski Song) दोन कल्चर दाखवणारे गाणे होते त्याचप्रमाणे याही चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक गाणे आहे ज्याचे ढोल टाईपचे संगीत आहे. आणि महिषासुर मर्दिनी स्तोत्र ‘अयिगिरी नंदिनी’ हे बोल ऐकायला मिळतात. पंजाबी आणि बंगाली संस्कृती दाखवण्यासाठी, तो एक अतिशय जुना स्टिरिओटाइप दिसत आहे. दोन्ही चित्रपटांची ही दोन गाणी जवळपास सारखीच आहेत.

‘2 स्टेट’ चित्रपटाचा सीक्‍वेन्स प्रेक्षकांना अतिशय भावला होता. यामध्ये तो शेवटी वडिलांच्या थेट समोर येतो. तो वडिलांचे त्याच्या आईवर रागावणे सहन करू शकत नाही तेव्हा तो अखेर त्यांच्यावर हात उचलतो. याचप्रमाणे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या ट्रेलरमध्ये रॉकी आणि त्याच्या वडिलांमध्ये भांडण दाखवली आहेत. यासारखे अनेक मुद्दे आलिया भट्टच्या 2014 साली आलेल्या ‘2 स्टेट’ व आताच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारखेच दिसून येत आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले असून 2 स्टेट चित्रपटाचा निर्माताही करणच होता. त्यामुळे रणवीर व आलियाची (Ranveer and Alia) जोडी असलेला हा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालतो याकडे चित्रपट समीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title : Rocky Aur Rani Ki Prem Kahani | rockey aur rani ki prem kahani is just 2 states with karan johar grandness here is everything common

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांचे श्रमदान, चाँदसैली घाटाने घेतला मोकळा श्वास

Maharashtra Municipal Elections | विरोधकांची ताकद दुभागल्याने ऑक्टोबरमध्ये महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता

Pune PMC News | समाविष्ट 34 गावांतील विकासकामांचा अहवाल तयार करण्याच्या समितीमध्ये 12 जणांना संधी मिळणार

Maharashtra Political Crisis | ‘शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात, कारण…’, भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Political Crisis | शिंदे गटात नाराजी, विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं; बच्चू कडूंनी बोलून दाखवली खदखद