Rohit Pawar | जिवंत खेकडा पत्रकार परिषदेत दाखवला, भाजपाचा संताप आणि ‘पेटा’चा थयथयाट, थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार, रोहित पवार म्हणाले…

मुंबई : Rohit Pawar | खेकड्यांनी धरण पोखरलं, हे तानाजी सावंत यांचे वाक्य महाराष्ट्रात कुप्रसिद्ध आहे. सध्या ते राज्याचे आरोग्य मंत्री आहेत. आणि याच आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केला होता.

यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा आणला होता. गंमत म्हणजे, साडेसहा हजार कोटींचा घोटाळा राहिला बाजूला, भाजपाने जिवंत खेकडा पत्रकार परिषदेत आणल्याबद्दल संताप व्यक्त करत निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे, तर याबाबत ‘पेटा’ने सुद्धा तक्रार केली आहे. यावर आता रोहित पवारांनी भाजपला धारेवर धरत त्या खेकड्याचे नेमके काय केले, याचे स्पष्टीकरण ‘एक्स’वर पोस्ट करून दिले आहे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत मी खेकडा दाखवल्यामुळे भाजप चांगलंच रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय. यातूनच त्यांनी माझ्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलं आहे.

वास्तविक मी दाखवलेला खेकडा हॉटेलमध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणार होता आणि नंतर तो नदीत सोडून दिला.
त्यामुळं खरंतर त्याचा जीव वाचला. पण तिकडं भाजपची मात्र यामुळं तडफड सुरू झाली आहे.
याचं कायदेशीर उत्तर मी देईलच पण तुम्ही काय म्हणणार अशा या बावचळलेल्या राजकीय खेकड्यांना?
असा सवाल रोहित पवार यांनी शेवटी केला आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा दाखवल्याने पेटा
या प्राणीमित्र संघटनेने देखील थयथयाट केला आहे. रोहित पवारांविरोधात पेटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
तसेच शरद पवार यांना पत्र लिहून त्यांनी राजकीय प्रचारासाठी प्राण्याला त्रास दिल्याचे म्हटले आहे.

पेटाने आपल्या पत्रात म्हटले की, सन २०१३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार निवडणूक प्रचारादम्यान,
गाढव, बैल, हत्ती आणि गाईंच्या वापरावर बंदी घातली होती.
निवडणूक अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत.
दरम्यान, पेटाने रोहित पवारांना देखील पत्र लिहून तो खेकडा
आमच्याकडे सोपवावा आम्ही त्याची देखभाल करु असे म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : तरुणीचा फोटो वापरुन इंन्स्टाग्रामवर तयार केले फेक अकाउंट, मॉर्फ फोटो व्हायरल करुन विनयभंग

Devendra Fadnavis In Indapur | इंदापुरातील कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, म्हणाले ”कृतीतून करून दाखवणार हा…”

Pune PMC Water Supply | पुणे मनपाकडून मोफतच पाणीपुरवठा, पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन