IndvsNz : विराटच्या अनुपस्थितीत रोहीतचे अनोखे द्विशतक होणार!

हॅमिल्टन (न्यूझीलंड) : वृत्तसंस्था- भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा एकदिवसीय सामना गुरुवारी ३१ जानेवारीला हॅमिल्टन इथं होणार आहे. अतापर्यंत या पाच सामन्याच्या मालिकेत भारताने ३-० ने आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचा हिटमॅन रोहीत शर्माकडे कर्णधार पदाची धुरा असणार आहे.

चौथ्या सामन्यात रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीतील २०० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यामुळे सर्वाधिक द्विशतक ठोकणारा रोहित शर्मा आपलं अनोखं द्विशतक पूर्ण करेल.

संघात विराट कोहलीच्या जागेवर शुभनम गिलला संधी मिळू शकते. १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये शुभनमने तुफान फलंदाजी केली होती. तसंच तिसऱ्या सामन्यातील दुखापतीमुळे महेंद्र सिंह धोनी खेळू शकला नव्हता. त्यामुळे या सामन्यात धोनी नसेल तर त्याच्याजागी कार्तिकच विकेटकीपिंगची धुरा संभाळेल.

दरम्यान, भारताने विजयी आघाडी घेतली असली तरी भारत जिंकण्यासाठीच मैदानात उतरेल. भारताने या सामन्यात ४-० आघाडी घेतली तर भारत नवा विक्रम रचेल. तोही तब्बल ५२ वर्षांनी हा विक्रम रचला जाईल. १९६७ मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारताने कसोटी मालिका ३-१ ने जिंकली होती.