Room Heater | हिवाळ्यात हिटर लावत असाल तर व्हा सावध, आरोग्याचे होऊ शकते गंभीर नुकसान; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Room Heater | कडाक्याच्या थंडीपासून (Winter Season) वाचवण्यासाठी लोक भरपूर उबदार कपडे घालतात परंतु तरीसुद्धा गारठतात. तर काही लोक हिवाळ्यात हिटरचा (Room Heater) आधार घेतात. हिटर थंडीपासून बचाव करतो. परंतु अनेक प्रकारचे आरोग्याचे नुकसान सुद्धा होते. तुम्ही सुद्धा हिवाळ्यात हिटरचा वापर करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या…

 

1. हिटर कसे काम करतो (How the heater works) –
बहुतांश हिटर्सच्या आत लाल-गरम धातुच्या तारा असतात किंवा सिरॅमिक कोर असते. हे खोलीचे तापमान वाढवण्यासाठी गरम हवा बाहेर टाकते. ही गरम हवा ओलवा शोषून घेते. हिटरने मिळणारी हवा खुप कोरडी असते. याशिवाय, हिटर हवेतील ऑक्सीजन जाळण्याचे कामही करतो. (Room Heater)

 

2. हिटरने होणारे नुकसान (Heater Disadvantages) –
हिटरने निघणारी हवा त्वचेचा खुप कोरडी करते. हिटरमुळे झोप न येणे, मळमळ, डोकेदुखी यासारख्या समस्या दिसून येतात. कन्व्हेंन्शन हिटर, हॅलोजन हिटर आणि ब्लोअरचा खुप जास्त वापर आजारी पाडू शकतो.

 

या हिटरमधून निघणारे केमिकल श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करते आणि आतील भागाचे नुकसान करते. विशेषता अस्थमा किंवा अ‍ॅलर्जीची समस्या असेल तर जास्त त्रास होतो.

3. या लोकांना हिटरजवळ बसणे जास्त धोकादायक –
अस्थमाच्या रूग्णांना रूम हिटरने सर्वात जास्त त्रास होतो. श्वासाची काही समस्या असेल तर हिटरपासून दूर बसावे. तसेच ब्रोंकायटिस आणि सायनसच्या रूग्णांना सुद्धा यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. या रूग्णांच्या फुफ्फुसात हिटरच्या हवेने कफ तयार होऊ लागतो आणि यामुळे त्यांना खोकला आणि शिंक येऊ लागते. आतल्या आत कफ सूकण्याच्या स्थितीत अँटीबायोटिक्स घेण्याची गरज भासते.

 

4. अ‍ॅलर्जीच्या लोकांसाठी खास हिटर –
हेल्थ एक्सपर्टनुसार, जर तुम्ही अस्थमाचे रूग्ण असाल किंवा अ‍ॅलजीची समस्या असेल तर सामान्य हिटरऐवजी ऑईल हिटरचा वापर करा. या हिटरमध्ये तेलाने भरलेला पाईप असतो, ज्यामुळे हवा कोरडी होत नाही. जर तुम्ही रेग्युलर हिटरचा वापर करत असाल तर तो काही मिनिटानंतर बंद करा. जर तुम्हाला सायनस किंवा ब्रोंकायटिसची समस्या आहे तर ह्यूमिडिफायरचा वापर करणे तुमच्यासाठी सर्वात चांगले राहिल. हे हवेत ओलावा कायम ठेवते ज्यामुळे श्वासासंबंधी कोणतीही समस्या होत नाही.

 

5. गॅस हिटर्सपासून रहा सावध –
संशोधनानुसार, ज्या घरात गॅस हिटर किंवा LPG हिटरचा वापर जास्त होतो त्या घरातील मुलांमध्ये अस्थमा जास्त आढळतो.
याशिवाय, खोकला, शिंक, छातीत धडधड आणि फुफ्फुसांचे नुकसान होते.
या हिटररमधून निघणारा कार्बन मोनोऑक्साईड प्रामुख्याने छोट्या आणि ज्येष्ठांवर वाईट परिणाम करतो.
एक्सपर्टनुसार, हिटर कधीही रजई किंवा गोधडीच्या आत ठेवू नये कारण आग लागू शकते.

 

Web Title :- Room Heater | room heater use side effects disadvantages winter health problems lungs suffocation precautions

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | OBC आरक्षणावरुन फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले; म्हणाले – ‘2 वर्षे कुठं झोपा काढत होते?’

Boxer Miriam Gutierrez | महिला बॉक्सरला चेहऱ्यावर पडल्या चक्क 237 बुक्क्या, भयानक सूज आल्यानं बदलला पूर्ण चेहरा..!

MahaTET Exam Scam | टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण ! तब्बल 500 उमेदवारांचे निकाल बदलले, 5 कोटींचा व्यवहार; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडीओ)