फसवणूक प्रकरणी रोझरीच्या अरान्हा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आलीशान कार खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचे कर्ज मंजूर करून घेऊन 1 कोटी 19 लाख 98 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी रोझरीचे स्कूलचे संचालक विनय विवेक अरान्हा यांचा अटकपूर्व न्यायालयाने फेटाळला.

याबाबत शिवाजी विठ्ठल काळे (40, श्रीराम सहनिवास सोसायटी, कात्रज डेअरीमागे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विवेक अल्फान्सो अरान्हा, दिप्ती आरान्हा तसेच बी. यु. भंडारी मोटर्स प्रा. लि. मुख्य संचालक देवेन भंडारी यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन मर्सडीज बेंझ कार खरेदी करण्यासाठी बी. यु. भंडारी मोटर्स प्रा. लि. ने दिलेल्या पावत्या आरान्हा यांनी बँकेत करून कर्ज घेतले होते. त्यानंतर याप्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर बँकेकडून दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनय आरान्हा यांनी अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्याला अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी विरोध करताना जामीन फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरान्हा यांचा जामीन फेटाळला.