मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Roshani Shinde Case | ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन राज्यातील राजकारण (Maharashtra Politics News) तापले आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) खासदार प्रियंका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेऊन फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पदावरुन हटवावे किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती. यानंतर आता शिंदे गटाच्या (Shinde Group) खासदार भावना गवळी (MP Bhavna Gawli) यांनी रोशनी शिंदे प्रकरणावरुन (Roshani Shinde Case) अमित शाह यांची भेट घेतली आहे.
अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर भावना गवळी म्हणाल्या, खरं तर त्यांना ठाण्यात प्रवेश करायचा होता. पण त्यांना ठाण्यात जाण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता. म्हणून रोशनी शिंदेंचं प्रकरण (Roshani Shinde Case) ठाकरे गट चालवत आहे. मात्र, रोशनी शिंदे यांना काहीही झालं नाही, असं पोलीस अहवालात निष्पन्न झालं आहे. तरी फक्त स्टंटबाजी करुन सरकार आणि एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) बदनाम करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यांच्याकडे हेच काम उरले आहे. त्यामुळे खोटे बोलणाऱ्यांची तपासणी करुन चौकशी करावी. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जावेत, अशी मागणी अमित शाह यांच्याकडे केल्याचे भावना गवळी यांनी सांगितले.
ज्यावेळी शीतल म्हात्रेंच (Sheetal Mhatre) प्रकरण झालं होतं त्यावेळी त्यामध्ये कोण होतं हे निष्पण्ण
झाल्यानंतर तेव्हा त्यांनी एक महिला म्हणून त्यांच्या मागे का उभे राहिले नहीत. तेव्हा महिला त्या नव्हत्या का.
महिलांना समोर करुन कोणीही राजकारण करु नये, असा इशारा भावना गवळी यांनी यावेळी दिला.
Web Title :- Roshani Shinde Case | bhavana gawali meet hm amit shah over roshani shinde case attacks thackeray group
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Akka Mahadevi | क्रांतिवीरांगना वैराग्ययोगिनी अक्कमहादेवी