Rotary Club of Pune-Katraj | जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांचा ‘समाज परिवर्तन पुरस्कार’ देऊन सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rotary Club of Pune-Katraj | जयराज ग्रुपचे संचालक (Director of Jayaraj Group) व समाजिक कार्यकर्ते (Social Activist) जयेश शहा (Jayesh Shah) यांना रोटरी क्लब ऑफ पुणे-कात्रज (Rotary Club of Pune-Katraj) यांच्यावतीने ‘समाज परिवर्तन पुरस्कारा’ने सन्मानीत करण्यात आले. सातारा रोडवरील इलेक्ट्रॉनिक इस्टेट हॉल येथे झालेल्या कार्याक्रमात रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल (Former Governor of Rotary Club) रो. मोहन पालेशा (Mohan Palesha), उद्योजक व पूना हॉस्पिटलचे ट्रस्टी नैनेश नंदू (Poona Hospital Trustee Nainesh Nandu) यांच्या हस्ते शहा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षा नमिता नाईक, रोटरी क्लबच्या सेवा प्रकल्पचे संचालक विवेक कुलकर्णी, सचिव अतुल दुर्वे, नितीन नाईक, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य, व्यापारी नितीन नहार तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Rotary Club of Pune-Katraj)

 

राजेश शहा गेल्या अनेक वर्षांपासून एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष (H. V. Desai Eye Hospital), त्याचबरोबर श्री पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी, जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ या संस्थेचे महासचिव, श्री महावीर जैन विद्यालय, पूना हॉस्पिटल, पूना गुजराती केळवाणी मंडळ, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी इत्यादी सामाजिक व शैक्षणिक संस्थाचे विश्वस्त इत्यादी अनेक संस्थांच्या माध्यमातून तसेच वेळोवेळी स्वतःच्या वयक्तिक आणि व्यासायिक पातळीवरून करीत असलेल्या सामाजिक कार्याची पावती म्हणून शहा यांचा ‘समाज परिवर्तन पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

 

Web Title :- Rotary Club of Pune-Katraj | Jayaraj Group Director Rajesh Shah felicitated with ‘Society Transformation Award’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | किरकोळ वादातून रिक्षा चालक तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

Popular Front of India (PFI) | PFI च्या रडारवर कोण कोण होतं? महाराष्ट्र ATS कडून खुलासा