रेल्वेमध्ये सराफा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याकडील २ कोटी रूपये  लुटले

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबईतील एका प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याचा कर्मचारी सौरभ जैन (वय ३३) हा मेंगलोर एक्स्प्रेसने मेंगलोरला जात असताना मध्यरात्री त्यास रेल्वेमध्ये लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. सौरभ जैन याच्याकडील सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचे ६ किलो सोने आणि ५ लाख रोकड लंपास करण्यात आली. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस स्थानकात चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, या धक्क्यामुळे सौरभ याची प्रकृती खालावल्याने त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57d6ce99-bfae-11e8-8b36-1fbfe903a151′]

पनवेल ते वीर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सौरभला लुटण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सौरभ हा मुंबईतील प्रसिद्ध सराफ व्यापारी चिराग जैन यांचा नातेवाईक आहे. तो त्यांच्याकडे मागील दोन महिन्यापासून काम करत आहे. तसेच तो मेंगलोर येथील सोनारांना सोने पुरवण्याचे काम करतो. सौरभ मुंबईहून मेंगलोरला निघत्तला होता. रात्री अडीच वाजता गाडी पनवेल वरुन वीर रेल्वे स्थानकाजवळ आली असता सौरभ स्वच्छतागृहात गेला. तो परत आल्यानंतर सोने आणि रोकड असलेली त्याची बॅग तो बसलेल्या ठिकाणी नव्हती. त्यानंतर त्याने लगेच डब्यातील पोलिसांना याची सूचना दिली. रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती चिपळून पोलिसांना दिली.

मशिदी समोर मुस्लीम बांधवांकडून बाप्पांवर फुलांचा वर्षाव

त्यानंतर रविवारी सकाळी त्याला रत्नागिरी पोलीस स्थानकात पाठवण्यात आले. तेथे त्याची तब्येत खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी सौरभकडून २ तास माहिती घेतली. लवकरच चोर पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. हा गुन्हा रायगड पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सांगितले. या बाबत पोलीस तपास करत आहेत. मुंबई ते वीर स्थनाकातील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले आहेत.