१२०० रुपयांची लाच स्विकारताना आरटीओमधील दोन एजंट अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाहन परवाना काढून देण्यासाठी एक हजार दोनशे रुपयांची लाच स्विकारताना ठाणे आरटीओ कार्य़ालयातील दोन एजंटला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ठाणे आरटीओ कार्यालयाच्या बाहेर आज (सोमवार) दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे आरटीओ कार्य़ालयातील एजंटमध्ये खळबळ उडाली आहे.
किशोर नवलमल जैन (वय -५३ रा. अंबर गॅलेक्सी, विटावा, ठाणे), समीर मतींन काझी (वय-३४ रा. इंदिरानगर, रुपदेवी, पाडा नंबर 2, जोस्ट बिल्डिंग जवळ, वागळे इस्टेट, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या दोन एजंटची नावे आहेत. याप्रकरणी २० वर्षीय तरुणाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार तरुणाला लर्निंग लायसन्स काढायचे होते. त्यासाठी त्याने ठाणे आरटीओ कार्यालयाबाहेरील एजंट जैन आणि काझी यांची शुक्रवारी (दि.७) भेट घेतली. त्यावेळी या दोघांनी तक्रारदार तरुणाकडे दोन हजार पाचशे रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये एक हजार दोनशे रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार तरुणाने लाचेच्या मागणीचे रेकॉर्डिंग करुन याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

पथकाने आज दुपारी एकच्या सुमारास ठाणे आरटीओ कार्य़ालयात सापळा रचून एक हजार दोनशे रुपयांची लाच स्विकारताना दोघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे आरटीओ कार्य़ालयातील एजंटचे धाबे दणाणले आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

तलाठी, लिपिक ३ हजाराची लाच स्वीकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
तृतीयपंथ्याकडून (देवदासी) २५ हजारांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक (API) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us