रूपा मयप्‍पन यांनी रचला इतिहास, बनल्या क्रिकेट संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांची मुलगी रूपा मयप्‍पन यांची तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. चेन्नईमध्ये झालेल्या आमसभेत त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. रूपा या तामिळनाडूच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.

20 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल देताना संघटनेला निवडणुकीची परवानगी देण्यात आली होती. प्रशासकीय समितीच्या काही नियमांची तामिळनाडू क्रिकेट संघटनेने अंमलबजावणी केली नसल्याने त्यांच्यावर निवडणुकीसाठी निर्बंध लावण्यात आले होते. रूपा गुरुनाथ मय्यपन या इंडिया सिमेंट्सचे मालक एन श्रीनिवासन यांच्या कन्या आहेत. त्यांचे पती गुरुनाथ मय्यपन यांचे नाव आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकले होते. मात्र आता त्यांच्या पत्नीने या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी संभाळल्याने त्यांचे देखील वजन वाढणार आहे.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये देखील फिक्सिंगचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यामध्ये अनेक खेळाडू आणि प्रशिक्षकांची नाव असल्याचा संशय व्यक्त झाला होता. त्यामुळे आता योग्य प्रशासन देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे.

Visit : policenama.com