पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जंगलाच्या मध्य भागात राहणारे आदिवासी शिक्षणाने अथवा आर्थिकदृष्ट्या कमी असतील, मात्र तेच मला खऱ्या अर्थाने सर्वाधिक श्रीमंत वाटतात. कारण आदिवासी पाड्यावर (Tribal Pada) मुलीच्या जन्माचे तीन दिवस स्वागत केले जाते. मी पुण्याचीच आहे. पुणेकर म्हणून जसा अभिमान वाटतो तशी खंत देखील वाटते. आदिवासी पाड्यांवर मुलींचे प्रमाण जास्त मात्र पुणे शहरात कमी असल्याची खंत महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी व्यक्त केली. तसेच आज देखील वंशाला वारसदार मुलगा हवा असतो, त्यासाठी मुलींची हत्या केली जाते. समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा असल्याचे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले.
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) पुण्यातील नऱ्हे येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, महिलांचे प्रश्न जेव्हा पुरुष समजून घेतील आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळी महिलांचे अर्धे प्रश्न संपतील. राज्य महिला आयोग म्हणजे पुरुषांच्या विरोधातच असा अनेकांचा गैरसमज होतो, मात्र आमची लढाई समाजाच्या विकृतीच्या विरोधात असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो.
प्रत्येक वेळेला तुमच्या मदतीला कोणी येईल ही भावना काढून टाका. स्वत:च्या आयुष्याची लढाई स्वत:च लढायची आहे.
मातीत घट्ट पाय रोवून उभे राहा अन् येणाऱ्या संकटाचा समाना करा,
असेही चाकणकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले.
Web Title :- Rupali Chakankar | state commission for women against perversity in society not men rupali chakankar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update